क्राईम न्युज

कराड येथिल शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे पुतळ्याजवळील वस्तीत अचानक मध्यरात्रीत सिलेंडरचा स्फोट ..आणि घरे होत्याची नव्हते झाले..!

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा)
कराड शहरामध्ये शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे पुतळ्याजवळील वस्ती मध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक म्हणे सिलेंडरचा स्फोट होऊन दुर्घटना घडली. जवळपास पंचवीस ते तीस घरे जळून खाक झाली. सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही. या ठिकाणी लागलेली आग कशाने लागली,परंतु आग लागल्यानंतर विविध स्तरातून प्रशासकीय अधिकार्‍यांकडून आणि सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या लोकांकडून मदतीचा हातही पुढे येऊ लागला आहेत. , सध्या तरी या वस्तीमध्ये एका रात्रीत मध्यरात्रीच्या वेळी..*… आणि घरे होत्याची नव्हती झाली..
गरीब माणसं, जीवाची खळगी कशीबशी भरणारी ही माणसं…. रोजच्या दोन चार मिळणाऱ्या रुपयात आपल्या चिमुकल्यांच्या सोबत राहणारी आणि तेवढ्याच मिळणाऱ्या पैशातून आनंदी वातावरणात जीवन जगणारी ही माणसं. रोजची गुजरान अशा पद्धतीने करून समाधानाने शांत झोपनारि माणसं.. सकाळी उठायचं आणि रोजच्या कामाला लागायचं,रोजच्या लिखित उद्योगाला जायचं एवढंच त्यांना माहीत.! अशी अचानक घटना घडेल ते कुणाच्या स्वप्नात ही आलं नसेल. शुक्रवारची मध्यरात्र शनिवार उजडत आवाज. अचानक भयानक आवाज कशाचा आला.या विचाराने हा देव होमगार्ड ड्युटीवर असणारा जणू देवमाणूसच, हा माणूस आवाज झालेल्या या वस्तीकडे धावत पळत सुटला. पाहतो तर या वस्तीमध्ये आग लागण्या सुरुवात झाली होती. हे पाहून या होमगार्ड देवकर नामक व्यक्तीने बहुतांश लोकांना झोपेतून जागे केले आणि घराबाहेर येण्यास सांगितले, तर काहींना स्वतः घराबाहेर आणले. या अशा धाडसी होमगार्डला तिरंगा रक्षक चा सलाम खरंच या होमगार्ड बांधवांने ही तत्परता दाखवली नसती तर मात्र मोठा अनर्थ घडला असता
हे मात्र नाकारता येत नाही. महिलांच्या आणि चिमुकल्या तसेच पुरुष मंडळींच्या ही घटना लक्षात आल्यानंतर धावाधाव आणि एकच आक्रोश या ठिकाणी सुरू झाला.तिथे महिलांची, चिमुकल्याची पळापळ धावाधाव, चिमुकली आणि भगिनी माता-भगीनीच्या काळजाचा उडालेला थरकाप अशा पद्धतीचा होता एखाद्या काल्पनिक कथेपेक्षाही भयानक पाहायला मिळाल्या.ही घटना घडल्यानंतर, स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते, नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन.. यांनी दुर्घटनेनंतर काही वेळातच परिसराला भेटीगाठी देण्यास सुरुवात केली.. काही दानशूर व्यक्ती कडून मदतीचा हातही पुढे येऊ लागल्याची ही उदाहरणे पाहावयास मिळत आहे. यावेळी प्रशासनानेही त्यांना मदत करण्यासाठी पाऊले उचललेली आहेत.या परिसरातील जवळपास 25 ते 30 घरे जळाल्याची घटना घडली. आता राजकीय मंडळींनी, समाजसेवी संस्थांनी, दानशूर व्यक्तींनी या पीडितांना मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कराड वासिय ती मदत करतील यात काडीमात्र शंका नाही. परंतु सध्या तरी एका रात्रीत एका क्षणात ….. आणि घरे होत्याची नव्हती झाली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!