ताज्या घडामोडी

कुपवाड मधील अशोका बारमध्ये गुंडांचा राडा …..बारमध्ये गुंडांचा गुंडाराज…

Spread the love

नेर्ले ( ता.वाळवा )
दारूच्या नशेत कृत्य : हॉटेलची तोडफोड व्यवस्थापकावर हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल…
सविस्तर असे की, कुपवाड एमआयडीसी तील हॉटेल आशोका मध्ये सहा जणांनी घुसून कोयत्याने हॉटेल मधील वस्तू ची तोड फोड केल्याची घटना आज समोर आली आहे. या तोडफोड दरम्यान हॉटेल व्यवस्थापक जखमी झाला असून हॉटेलमधील सुमारे 40 ते 50 हजारांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुपवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड एमआयडीसी मध्ये असलेल्या अशोका हॉटेल मध्ये घुसून कोयत्याने तोड फोड केली आहे. त्यानंतर इतर इसमांनी बारमधील खुर्च्या, बारमधील बाटल्या, शोकेश, दरवाज्याची काच, सीसीटीव्ही कॅमरे इत्यादी वस्तुची तोडफोड करीत असताना त्यामधील एका इसमाने हॉटेल मॅनेजर नागनाथ निवृत्ती शिंदे वय 32 वर्षे रा. ज्ञानगिरी वसाहत सावळी ता. मिरज जि. सांगली मुळ रा. बनेवाडी ता. कवठेमहंकाळ जि. सांगली याच्या डोक्यात काचेची बाटली फेकुन मारुन त्यास जखमी केले. मालकाचा मुलगा प्रतीक यास शिवीगाळ करुन. सदर बार मधील 40 ते 50 हजार रुपयाचे साहित्याचे नुकसान केल्याची घटना घडली असून त्या इसमांचे वय 20 ते 25 वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
या घटनेने हॉटेल व्यवसाईकाच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या गुन्ह्याचा अधिक तपास सपोफो चौगुले हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!