ताज्या घडामोडी

चिखली येथील सोमनाथ भालेकर याना सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी पुरस्कार.

Spread the love

चिखली ( ता.शिराळा ) येथील सोमनाथ भालेकर यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून दिला जाणारा यंदाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी म्हणून दहा वर्षे काम पाहिले होते . पांडुरंग कारखान्याच्या ऊस व विकास विभागाने कारखान्याच्या ऊस बेणे मळ्यात विविध वाणांचे बेणे तयार केले आहे . चांगला साखर उतारा व उत्पादन देणाऱ्या वाणांचे ऊस बेणे व रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो . पाणी व माती परीक्षणासाठी कारखान्याने सुसज्ज अशा प्रयोगशाळेची उभारणी केली आहे . चांगल्या दर्जाचा ऊस गाळपास येण्यासाठी कारखाना प्रशासनाचे व ऊस विकास विभागाचे विशेष लक्ष असते या बाबींची दखल
घेऊन भालेकर यांना इन्स्टिट्यूटच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक , उपाध्यक्ष कैलास खुळे , कार्यकारी संचालक डॉ.यशवंतराव कुलकर्णी , संचालक मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!