ताज्या घडामोडी

विदेशी भारतीय सन्मान

Spread the love

१४ दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले बहरीन स्थित श्री शरदचंद्र कुलकर्णी यांनी मुंबईतील भोईवाडा पोलीस स्टेशन येथील ज्येष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र पवार यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. विदेश स्थित भारतीय नागरिकांना कठीण प्रसंगी मदतीचा हात देणारे श्री शरदचंद्र कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या समृध्द मातृभाषा अभियानातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पुरस्कृत करणे याचा सर्वस्वी अभिमान वाटतो असे मत ज्येष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र पवार यांनी यावेळेस व्यक्त केले. विविध गुन्हे सहजपणे शोधून काढत मानवतेच्या दृष्टीने पोलीस दलात कार्य करणारे श्री जितेंद्र पवार यांच्या द्वारा सन्मान होणे माझे भाग्य आहे असे प्रशंसोद्गार श्री शरदचंद्र कुलकर्णी यांनी या प्रसंगी काढले. वेद फाउंडेशन सचिव श्रीमती माधुरी कुलकर्णी तथा नंदा फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष श्री स्वप्निल राणी नंदकुमार विशेष उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!