ताज्या घडामोडी

‘त्या ” शिवसैनिकाविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी ” गुन्हा दाखल करा!चर्मकार संघाची मागणी

Spread the love

राणा  दांपत्याच्या विरोधात आंदोलन करताना वाकोला येथील शिवसैनिक राजू नाईक याने चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.त्याच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक अर्थात ‘अ‍ॅट्रॉसिटी ” कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता चर्मकार विकास संघाचे मुंबई अध्यक्ष सुभाष मराठे-निमगावकर यांनी केली आहे.

राजू नाईक हा वाकोला येथील शिवसैनिक असून त्याने प्रसार माध्यमांसमोर बोलताना अत्यंत जातीवाचक उच्चार केला. त्याने चर्मकार समाजाला ‘चोर चांभार’ म्हटले आहे. हा चर्मकार समाज आणि संत शिरोमणी रविदास महाराज यांचा घोर अपमान आहे तेव्हा त्याच्यावर ‘अ‍ॅट्रॉसिटी” अ‍ॅक्ट सारखी कडक कारवाई करावी अन्यथा चर्मकार विकास संघ संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही चर्मकार विकास संघ मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे-निमगावकर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!