क्रीडा व मनोरंजन

इनडोअर क्रिकेट मैदानी निवड चाचणीला चांगला प्रतिसाद खेळाडूंनी आपल्या नैसर्गिक खेळावर भर द्यावा –

Spread the love

मुंबई, २५ एप्रिल, (क्री. प्र.): जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ८ ते १५ ओक्टो. २०२२ या कलावधीत इनडोर क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात आयोजित करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनने (IISF) भारतीय संघाची बांधणी करण्यासाठी राष्ट्रीय निवड स्पर्धा लवकरच बेंगलोर येथे आयोजित केली जाणार आहे. यासाठी महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्रात मैदानी निवड चाचणी घेण्याचे जाहीर केले होते.

काल मुंबईत दादर येथे अर्बन स्पोर्ट्स सेंटर, (अँटोनीया डिसील्वा टेक्निकल हाय.), स्वा. सावरकर मार्ग, शिवाजी पार्क येथे निवड चाचणी आयोजित केली होती. या निवड चाचणीला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळच्या सत्रात महिला व २१ वर्षाखालील मुलींनी हजेरी लावली होती तर दुपारच्या सत्रात पुरुष व २१ वर्षाखालील मुलांनी हजेरी लावली होती.

या निवड चाचणीला लेखक, जेष्ठ क्रिकेटपट्टू व प्रशिक्षक विलास गोडबोले, माजी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू वृंदा भागवत व मुंबई व रेल्वेची माजी महिला क्रिकेट खेळाडू वीणा परळकर उपस्तीत होते निवड सदस्य म्हणून उपस्थित होते. या चाचणीचे उद्घाटन विलास गोडबोले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून केले त्यावेळी महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष क्षितिज वेदक, महासचिव बाळ तोरसकर, खजिनदार राजू देसाई व क्रीडा चाहते उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूंनी आपल्या नैसर्गिक खेळावर भर द्यावा असे गोडबोले यांनी संगितले. खेळाडूंना विलास गोडबोले यांनी विशेष मार्गदर्शन केले. लवकरच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात अशाच प्रकारे निवड चाचणीचे आयोजन करणार असल्याचे बाळ तोरसकर– महासचिव यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!