खोंदलापुर धनगर वाड्याचा दारूबंदी उपक्रम आदर्श-प्रवीण काकडे
खोंदलापूर धनगरवाडयाने सलग ४४ वर्ष दारुबंदी करून खुप मोठा आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडेसाहेब यांनी केले ते खोंदलापुर ता शिराळा जि सांगली येथे सत्यनारायण पुजा गेली ४४ वर्षापासून दारुबंदी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते याप्रसंगी मा सत्यजित देशमुख संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅक हणमंतराव पाटील माजी सभापती चांदोली अभयारण्य वनक्षेत्रपाल नलवडेसाहेब सरपंच बाबुराव गावडे प्रमुख उपस्थित होते काकडे पुढे म्हणाले की खोंदलापुर अतिशय घनदाट जंगलात व डोंगर दऱ्याखोऱ्यात व अभयारण्यात वसलेल्या या गावाने एकीच्या बळावर या गावाने महाराष्ट्र शासनाकडून दारुबंदी चा पुरस्कार मिळवून या गावात दारु पिणाऱ्या व्यक्तीला प्रवेश नाकारले जातो हेच वैशिष्ट्य आहे यावेळी धाकलु गावडे पोलीस पाटील नितीन गावडे जनार्दन गावडे धनाजी वाघमोडे बाबुराव गावडे प्रथमेश काकडे सीताराम गावडे कोडीबा अनुसे बाबुराव डोईफोडे उपस्थित होते यावेळेस भागातील सर्व धनगरवाडथावरील समाज बांधव उपस्थित होते