आरोग्य व शिक्षण

वडगावमधील रस्ते व चौकांचे नामकरण करावे

वडगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

Spread the love

वडगाव : ऐतिहासिक शहर असणाऱ्या वडगाव मधील मुख्य रस्त्यांचे तसेच मुख्य चौकांचे नामकरण करावे यासाठी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नगरपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे.

वडगावच्या भूमीत वीरमरण आलेल्या सरदार नारो बापूजी देशपांडे या सरदारांच्या समाधीचा पहिला दगड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः येऊन लावला असल्याची इतिहासात नोंद आहे. याच भूमीत श्रीमंत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने इंग्रजांचा दारुण पराभव केला होता. श्रीमंत महादजी शिंदे यांचे स्मारकही उभारण्यात आले आहे. अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या वडगाव शहरातील इतिहासाचा नव्या पिढीला विसर पडू लागला आहे.हा इतिहास अजरामर व्हावा व या वीर पुरुष यांनी केलेल्या पराक्रमाचे स्मरण राहावे म्हणून शहरातील रस्ते व चौकांचे नामकरण करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

 

बाजारपेठेतील रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता,माळीनगर येथे नव्याने झालेल्या रस्त्याला श्रीमंत सरदार महादजी शिंदे रस्ता, तळेगाव वडगाव साखळी रस्त्याला सरसेनापती खंडेराव दाभाडे रस्ता तसेच चांदणी चौकाचे नाव बदलून राजमाता जिजाऊ चौक व भेळ चौकाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!