आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरमध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व झेरॉक्स मशीन प्रदान कार्यक्रम संपन्न!!!!

राजश्री म्हस्के यांच्या हस्ते झेरॉक्स मशीन प्रदान करण्यात आली.

 

 आमदार कृष्णराव भेगडे मावळ विकास – प्रतिष्ठान यांच्या वतीने ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरमध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, झेरॉक्स मशीन प्रदान आणि दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. व्याख्याते प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी करिअर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार, शालेय समिती सदस्य अशोक काळोखे, आनंद भेगडे, प्रतिष्ठानच्या संचालिका राजश्री राजेश म्हस्के, संचालक ॲड. पेटकर , सुखेंदू कुलकर्णी, प्रशांत भागवत, वसंत पवार, प्रकाश शिंदे उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. प्रमोद बोराडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर असणाऱ्या करिअरच्या अनेक शाखांची ओळख करून दिली. कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवताना अभ्यास करणे महत्त्वाचे आहे असा संदेश दिला.

नंदकुमार शेलार यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यानंतर एस.एस.सी. बोर्ड 2022 मध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच, मुख्यध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद, लिपिक,कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

राजश्री म्हस्के यांच्या हस्ते झेरॉक्स मशीन चे प्रदान करण्यात आले

प्रमुख व्याख्यातांचा परिचय मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग कापरे यांनी केले. तर आभार शिक्षक प्रतिनिधी दुर्गा भेगडे यांनी   मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाराणी गुंड व वैशाली कोयते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये