आपला जिल्हामहाराष्ट्रशेती शिवार

मावळचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांना, राजेश खाडभोर यांचे, मावळ मध्ये खत पुरवठा सुरळीत करणे बाबत  निवेदन..

 मावळचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांना, शिवसेनेचे नेते राजेश खाडभोर यांचे, मावळ मध्ये खत पुरवठा सुरळीत करणे बाबत  निवेदन देण्यात आले.

 आवाज न्यूज: महोदय आपणाला वरील विषयावर निवेदन देण्यात येते कीं मावळ मध्ये शेतीची कामे सुरू असून प्रामुख्याने भात शेतीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते, त्या मूळ शेतकऱ्यांना यूरीया व सम्राट व इतर खते वापरावर भर असतो. पण खत पुरवठादारां कडून, मावळ च्या डीलरला कमी खत पुरवठा होत असल्याने, मावळ मधील शेतकरी हा चाकण किंवा इतर ठिकाणा वरून खत घेऊन येत आहे. त्यात शेतकऱ्यांचा वेळ व अतिरिक्त पैसा वाया जात आहे. तरी शेतीच्या कामाला वेग आला असून, आपण खत पुरवठा करावा,जेणे करून शेतकरीवर्गाचे खता अभावी शेतीची कामे रखडायला नको. आपण या बाबत वेळीच लक्ष घालून खत, पुरवठा सुरळीत करावा, अशा आशयाचे निवेदन मावळ चे शिवसेनाप्रमुख राजेश खांडभोर यांनी दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये