ताज्या घडामोडी

लायन्स क्लब आयोजित जिल्हाअजिंक्यपद खो खो स्पर्धा दादर मध्ये रंगणार

Spread the love

जूनियर (१८ वर्षाखालील) व व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा दादर मध्ये

मुंबई, १७ मे (क्री. प्र.) : मुंबई खो खो संघटनेच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ माहीम आयोजित मुंबई जिल्हा कुमार व मुली गट (जूनियर – १८ वर्षाखालील) अजिंक्यपद खो-खो स्पर्धा व लायन्स क्लब ऑफ एलिट आयोजित मुंबई जिल्हा व्यवसायिक अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिनांक १८ ते २२ मे, २०२२ या कालावधीत कै. केशवराव दाते क्रीडांगण, आगाशे पथ, पोर्तुगीज चर्चच्या मागे, दादर (प.) या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३१ए१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रसाद पानवलकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या प्रसंगी सर्व खोखो संघांना मेडिकल किट लायन्स डिस्ट्रिक तर्फे देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे वैशिट्य म्हणजे या वर्षी प्रथमच महिला व्यावसायिक गटाची अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. याची नोंद रसिक प्रेक्षकांनी घ्यावी. या स्पर्धेत व्यावसायिक पुरुष ९ व महिला ३ कुमार ९ तर मुलींचे ८ संघ सहभागी झालेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!