आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

उज्ज्वल भविष्याचे एकच धोरण;राखी बांधून पर्यावरणाचे करूया रक्षण’ अशा दृढ संकल्पाने रक्षाबंधन उत्साहात साजरा

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 10/08/2022 रोजी 'वृक्षांना राखी बांधून राखी पौर्णिमा ' उत्साहात साजरी करण्यात आला.

Spread the love

उज्ज्वल भविष्याचे एकच धोरण;राखी बांधून पर्यावरणाचे करूया रक्षण’ अशा दृढ संकल्पाने रक्षाबंधन उत्साहात साजरा

आवाज न्यूज: राजेश बारणे, मावळ प्रतिनिधी ११ ऑगष्ट.

श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 10/08/2022 रोजी ‘वृक्षांना राखी बांधून राखी पौर्णिमा ‘ उत्साहात साजरी करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव. मिलिंदजी शेलार सर; शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद शेख मॅडम,शालेय पर्यवेक्षिका .रेणू शर्मा मॅडम यांच्या हस्ते वृक्षास राखी बांधून करण्यात आली.याप्रसंगी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख .तेजस्विनी सरोदे,प्राथमिक विभाग प्रमुख.धनश्री पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्याच्या मनामध्ये राखीच्या माध्यमातून वृक्षांप्रती बंधूभाव रुजावा या दृष्टिकोनातून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जाणीव निर्माण करणे,पर्यावरणसंरक्षण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा कार्यक्रमाचा हेतू .रक्षाबंधना’चे औचित्य साधून विद्यालयात राखी निर्मिती स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे सचिव .मिलिंद शेलार सर यांनी पर्यावरण, वृक्षारोपण याचे महत्त्व सांगून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका   शमशाद शेख मॅडम व शालेय पर्यवेक्षिक.  रेणू शर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले .
या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे,शालेय समिती अध्यक्षा .रजनीगंधा खांडगे मॅडम,उपाध्यक्ष दादासाहेब उ-र्हे ,सचिव .  मिलिंद शेलार सर,कार्याध्यक्ष.बाळासाहेब शिंदे यांनी करून सर्व विद्यार्थ्यांना ‘प्रेमाचे बंधन बांधून वृक्षांना द्या मानपान ;पर्यावरणाचा राखा मान’असा संदेश दिला .
‘काम करा लाखमोलाचे; निसर्ग आणि त्याच्या संवर्धनाचे’ जय घोष करत रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!