ताज्या घडामोडी

बावची (ता.वाळवा ) पूर्वभाग विकास सोसायटीच्या नूतन संचालकांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार

Spread the love

इस्लामपूर दि. २२ (प्रतिनिधी)
बावची (ता.वाळवा ) पूर्वभाग विकास सोसायटीच्या नूतन संचालकांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील,राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी नूतन संचालकांचे स्वागत केले.
राजारामबापू सहकारी बँकेचे संचालक विजयराव यादव,सरपंच वैभव रकटे,माजी पं. स.सदस्य लालासो अनुसे, पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष सतिश पाटील,माजी सरपंच अनिल शिंगारे,मानसिंग पाटील,उल्हास माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणूकीत या पॅनेलने सर्व जागा जिंकल्या आहेत. नूतन संचालक संजय जाधव,किरण माळी,ईश्वर रकटे,सुनिल यादव,भगवान कोकाटे, विश्वनाथ तळप,विकास पाटील, शंकर पाटील,यशवंत अनुसे,रमेश बामणे,विलास यादव,राजाक्का पाटील, संगिता पाटील, तसेच माजी सरपंच वंदना शिंदे,नितीन पाटील,बाळासो देसाई,आनंदा शिंदे,सचिन अडिसरे,पांडुरंग यादव,रहिम मुजावर,जयवंत पाटील,जालिंदर यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना बावची पूर्वभाग सेवा सोसायटीचे नूतन संचालक. समवेत पी.आर. पाटील,प्रा.शामराव पाटील,विजयराव पाटील, विजयराव यादव,वैभव रकटे,लालासो अनुसे व कार्यकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!