आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

युवा कार्यकर्ते धनंजय काळोखे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

शिबीराचा २३७ लोकांनी घेतला लाभ.  

 

युवा कार्यकर्ते धनंजय काळोखे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत नेञतपासणी , चष्मेवाटप , मोतीबिंदू शस्ञक्रिया शिबीराचा २३७ लोकांनी घेतला लाभ.  

आवाज न्यूज :मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ११ ऑगष्ट 
लोणावळ्यातील युवा कार्यकर्ते धनंजय वसंतराव काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेञतपासणी , चष्मेवाटप , मोतीबिंदू शस्ञक्रिया शिबीराचा २३७ लोकांनी घेतला लाभ घेतला. यावेळी पांगळोली येथील जिल्हापरिषद शाळेतील सुमारे १०० विद्यार्थांना , विद्यार्थीनीना ता.१० रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंच मावळ व एच व्ही देसाई यांच्या विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते प्रतिमेचे पूजन व नारळ फोडून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष विलासभाऊ बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, जेष्ठ नेते नारायण पाळेकर , महिला शहराध्यक्षा उमाताई मेहता, कार्याध्यक्षा मंजुश्रीताई वाघ , संयोगिता साबळे, मा नगरसेविका  अंजना ताई कडू, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विनोदभाऊ होगले, उपाध्यक्ष अजिंक्य कुटे, वरिष्ठ उपाध्यक्ष रज्जाक पठाण , जेष्ठ नेते यशवंत पायगुडे , दिलीप पवार, पै शुभम मावकर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी जाकीर खलिफा , उद्योजक अविनाश ढमढेरे , विभाग अध्यक्ष वैभव पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ बोराटी व उद्योजक धवल चौहान सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे उद्गाटन करून सुरुवात करण्यात आली.

यावेळी पक्षाच्या वतीने गोल्ड व्हॅली विभागा कडून पांगोळी येथील जिल्हा परिषद शाळा येथील आदिवासी शंभर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले, व सुमारे २३७ महिला , पुरूषांनी नेञतपासणी , चष्मेवाटप आणि मोफत मोतीबिंदू शस्ञक्रिया या योजनेचा लाभ घेतला व उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये