ताज्या घडामोडी

शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला व बालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न.

Spread the love

प्रतिनिधी / शिराळा येथे आज विश्वासराव नाईक साखर कारखाना व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उद्या (ता. 26) जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खास महिला व बालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उद्‌घाटन आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. दिवसभर चाललेल्या शिबीरात 150 वर महिला, बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीचे काम जयंत नेत्रलय इस्लामपूर मार्फत करण्यात आले. उद्‌घाटन प्रसंगी महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सौ. साधना पाटील, शिराळा नगराध्यक्ष प्रतिभा पवार, जिल्हा सरचिटणीस सौ. वैशाली कदम, तालुका सरचिटणीस शुभांगी देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्चना कदम, नगरसेवक सुनंदा सोनटक्के, ॲड. नेहा सुर्यवंशी, आशा साळुंखे, नुतन साठे, वंदना यादव, स्मिता महिंद, मिनाक्षी पाटील, विजया नायकल, रखमा माने, कल्पना गायकवाड, सुप्रिया पाटील, जायंटस्‌ ग्रुप अध्यक्ष सविता नलवडे, तालुका युवती अध्यक्ष शितल पाटील, सुप्रिया पाटील, रेश्मा पवार, पुजा पाटील, कोमल कवठेकर आदी मान्यवर व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!