आपला जिल्हामहाराष्ट्र

बहीण भावातील पविञ नात्याला उजाळा देणारा रक्षाबंधन सण लोणावळा परिसरात साजरा.

द्रौपदिने, भगवंताला श्रीकृष्णाला फक्त चिंधी बांधली होती , तर तिचे ऋण त्यांनी शेकडो वस्ञे पुरवून तिचे लज्जारक्षण केले होते..

बहीण भावातील पविञ नात्याला उजाळा देणारा रक्षाबंधन सण लोणावळा परिसरात साजरा.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.११ प्रतिनिधी.

बहीण भावातील पविञ नात्याला उजाळा देणारा रक्षाबंधन सण लोणावळा परिसरात साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक बहिणीँनी कालपासूनच माहेरी जावून भाऊरायाला रक्षाबंधन निमित्त पविञ राखी बांधली.
आज जवळ असणाऱ्या बहिणी भावाला ओवाळून त्याला गोड पेढे , साखर भरवून पंचारतीने ओवाळून कपाळावर कुंकूमतिलक लावून राखी बांधण्यासाठी आल्या होत्या.

लहान व मोठ्या सर्वच बहिणी आजच्या दिवशी भावाला ओवाळून राखी बांधत असल्याने भाऊ बहीणीत प्रेमाची रेशीमगाठ मनगटावर भाऊ मिरवत असतो..हाताला बळ दे , भावाचे आयुष्य वाढू दे , सुखात , समाधानाचे जीवन त्यास लाभू दे , त्याने आपल्या सुखदुःखात सहभागी व्हावे,

अडीअडचणीमधे सहकार्याने मदतीचा हात पुढे करावा , अशीही त्यांची भावना असते, द्रौपदिने, भगवंताला श्रीकृष्णाला फक्त चिंधी बांधली होती , तर तिचे ऋण त्यांनी शेकडो वस्ञे पुरवून तिचे लज्जारक्षण केले होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये