आपला जिल्हामहाराष्ट्र

राष्ट्रीय मातृछाया जनसेवा फाउंडेशन चे सिंहगड रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम संपन्न..

सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते.

राष्ट्रीय मातृछाया जनसेवा फाउंडेशन चे सिंहगड रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित..

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी,  पुणे प्रतिनिधी. ११ ऑगष्ट.

राष्ट्रीय मातृछाया जनसेवा फाउंडेशन चे सिंहगड रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी, फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ अहिरे , पुणे शहर पोलीस सहा आयुक्त पवार साहेब, सिंहगड रोड पोलीस स्टेशन निरीक्षक शैलेश संके सर, फाउंडेशनचे मानव सुरक्षा सेवा समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष धनराज गवळी, महिला प्रदेशाध्यक्ष रेश्मा पोकळे, राष्ट्रीय महिला संघटक सुनिता गरुड, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष उर्मिला आंबेकर, पुणे शहर अध्यक्ष सतीश कोळी, हवेली तालुका महिला अध्यक्ष वैशाली अहिरे, फाउंडेशन सदस्य राजेगावकर, फाउंडेशनचे विविध महिला पुरुष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते व पोलीस स्टेशनचे महिला पुरुष पोलीस बांधव भगिनी उपस्थित होते.

यावेळी फाउंडेशनच्या सर्व महिला पदाधिकारी यांच्या हस्ते पोलीस बांधव, महिला पोलीस भगिनींना व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की. समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे.

सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये