ताज्या घडामोडी

आजकाल परमार्थही स्वार्थासाठी केला जात आहे – प्रसिद्ध कीर्तनकार वसंतगडकर.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : स्वतःला काही न मागता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी देवाकडे पसायदान मागितले, मात्र आजकाल परमार्थही स्वार्थासाठी केला जात आहे, असे परखड मत सुप्रसिध्द किर्तनकार संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर (वसंतगड, ता. कऱ्हाड) यांनी मांडले.
येथील मरीमी चौकात लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट चिखली व प्रचिती सांस्कृतिक मंच शिराळा मार्फत कै. लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सुरू झालेल्या ‘‘किर्तन महोत्सवात’’ काल (ता. 23) त्यांनी दुसरे किर्तनपुष्प गुंफले.
ते म्हणाले, मनुष्य जन्माच्या उध्दाराठी ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकोबारायांनी एवढे विपुल लेखन केले आहे, त्याचेच विवेचन करताना व ऐकताना जन्म पुरणार नाही. त्यामुळे भजन किर्तनाच्या कार्यक्रमातून वॉटस्अप, विनोद, चुटके, नकला आदी गोष्टींची गरज काय. आजकाल असे सांगण्याचा जणू हा रोगच जडल्याचे चित्र आहे. कर्तन, प्रवचन, भजन ही व्यासपीठे ज्ञानदान, भक्तीमार्ग, संतांची शिकवण सांगणारी आहेत. ज्या उद्देशाने ती निर्माण झाली अथवा केली गेलीत तोच उद्देश तेथून सार्थ व्हायला हवा. समाजाने भूत काढण्यासाठी ज्याच्याकडे जायचे त्यालाच भूताने झपाटले आहे, अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.
वसंतगडकर महाराज म्हणाले, मानव जन्म 84 लक्ष योनीतून पार झाल्यानंतर होतो. जन्मापासून मृत्यू पर्यंत संघर्ष चालतो ते जिवन होय. विधात्याने जशी प्रत्येक मूर्ती वेगळी बनवली आहे, तशी सुख: आणि दु:खे कशी एकसारखी असतील. प्रपंचाचा व जिवनाचा गोवर्धन भगवंताने फक्त करंगळी तारला आहे. त्याची शक्ती अपंरपार आहे. ज्या दिवशी भगवंत करंगळी काढून घेतो, त्यावेळी सर्वकाही संपत. म्हणून संसार करता करता थोडा परमार्थही करावा, पुण्य मिळते, असे संतांनी सांगीतले. मात्र आजकाल परमार्थ केला जातो, तो ही स्वार्थासाठी. स्वार्थ साधला कि परमार्थ व देवालाही आपण सोईने विसरतो, चित्र बदलायला हवे. सर्मपीत भावनेने परमार्थ व्हायला हवा. जागाचा त्राता आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही आत्मसर्मपन करायला हवे.
प्रबोधनाने समाजापुढील वास्तव उघड करत वसंतगडकर महाराजांनी ‘‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’’ या अभंगाचे आपल्या मधून वाणीने सुंदर निरूपन केले. ते करत असताना प्रबोधन करत त्याने समाजात व भक्ती मार्गात निर्माण झालेल्या अनिष्ट गोष्टींवर तिखट शब्दात अप्रत्यक्षपणे असूड ओढले. सुमारे दिड तासाहून अधिक काळ चाललेल्या किर्तनाने श्रोत्यांना अक्षरशा खिळवून ठेवले. पकवाज वादक मदन कदम (सातारा), तबलजी मयुर उबाळे यांनी सुरेख साथ दिली. कृष्णात नलवडे विणेकरी होते. लादेवाडी, सरुड, सागाव, मांगले, महादेववाडी, थेरगाव, शिराळा, रेड, खेड, बेलदारवाडी, शिवरवाडी येथील भजनी मंडळींनी साथ केली.
प्रारंभी किर्तनकार बाळकृष्ण दादा वसंतगडकर, नगराध्यक्ष प्रतिभा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, नगरसेवक सुनंदा सोनटक्के, अर्चना कदम, वैशाली कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कीर्तनाची सुरवात झाली. आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक व माजी सरपंच प्रमोद नाईक यांच्या हस्ते वसंतगडकर महाराजांचा सत्कार झाला. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संपतराव शिंदे, राष्ट्रवादी शिराळा शहरचे अध्यक्ष सुनील कवठेकर, नगरसेवक मोहन जिरंगे, अजय जाधव, भगवान पाटील, सचिन शेटे आदी मान्यवर, वारकरी मंडळी, भक्त व श्रोते मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रचिती’चे अध्यक्ष डी. एन. मिरजकर, एस. एम. पाटील, आर. बी. शिंदे, नवनाथ महाराज (मांगले) यांनी नेटके संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!