आपला जिल्हामहाराष्ट्र

बेपत्ता पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला छिन्नविछिन्न अवस्थेत  चाकण पोलिसां कडून संपूर्ण परिसरात कसून तपास सुरु..

पुणे जिल्ह्यातील गेल्या महिन्यापासून ही दुसरी घटना घडली आहे.

बेपत्ता पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला छिन्नविछिन्न अवस्थेत  चाकण पोलिसां कडून संपूर्ण परिसरात कसून तपास सुरु..

आवाज न्यूज: प्रतिनिधी १२ ऑगष्ट

कृष्णा ही बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाईकांनी याबाबत चाकण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार चाकण पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस या घटनेचा तपास करत होते.

त्यानंतर राहत्या घरापासून काही अंतरावर झाडाझुडपात बुधवारी सकाळी कृष्णा हिचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. या बाबत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा बुधवारी बेपत्ता होती. त्या बाबत चाकण पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल होता. गुरुवारी सकाळी कृष्णा हिचा मृतदेह श्वानांकडून ओढून नेला जात असल्याचे स्थानिकांनी पहिले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

श्वानांनी कृष्णा हिच्या शरीराचे लचके तोडलेले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी नंतर या बाबत अधिक स्पष्टता येईल. घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर, काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

दरम्यान पोलिसांनी बंगला वस्ती भागात राहणाऱ्या नागरिकांकडे कसून चौकशी सुरु केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वास्तव्यास असल्याने त्या सर्वांच्या मागील दोन दिवसातील हालचाली आणि या भागातील सीसीटीव्ही तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील गेल्या महिन्यापासून ही दुसरी घटना घडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये