आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

तळेगाव स्टेशन स्थित इंग्रजी माध्यमाच्या “कांतीलाल शहा विद्यालयात, तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ज्येष्ठ पत्रकार अमीन खान, यांच्या सत्काराचा औपचारिक कार्यक्रम, विद्यालयाच्या वतीने कांतीलाल शहा, विद्यालयाच्या सभागृहात संंपन्न!

विद्यालयाच्या अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या *प्राचार्य पद्मिनी तेजांनी मॅडम* यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे विचारपूर्वक "चार गट विभागून"-- अत्यंत शिस्तबद्ध लष्करी पद्धतीचं संचलन पाहायला मिळाले.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी १२ ऑगष्ट 

तळेगाव स्टेशन स्थित इंग्रजी माध्यमाच्या “कांतीलाल शहा विद्यालयात, तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ज्येष्ठ पत्रकार अमीन खान, यांच्या सत्काराचा औपचारिक कार्यक्रम, विद्यालयाच्या वतीने कांतीलाल शहा, विद्यालयाच्या सभागृहात संंपन्न.

विद्यालयाच्या अत्यंत अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या *प्राचार्य पद्मिनी तेजांनी मॅडम* यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे विचारपूर्वक “चार गट विभागून”– अत्यंत शिस्तबद्ध लष्करी पद्धतीचं संचलन पाहायला मिळाले.

चारही गटाला, जल, अग्नी ,पृथ्वी आणि वायू”,अशी समर्पक नाव देण्यात आली होती. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक गटातील शीर्षकाप्रमाणे विश्वात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात या” जल, अग्नी, पृथ्वी आणि वायूच”– किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे- समजून सांगण्यात आल होतं! दीप प्रज्वलन झाल्यानंतर कांतीलाल शहा विद्यालयाचे, चेअरमन सन्माननीय शैलेशभाई शहा, यांनी सर्व उपस्थित मान्यवरांच स्वागत केले. त्यानंतर नवनिर्वाचित पत्रकार संघाचे अध्यक्ष अमीन खान, सरांचा- लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी, यांच्या समवेत विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

सैनिकी थाटात संचलन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.  त्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉक्टर भंडारी, यांनी– आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आपण खरोखरच किती भाग्यवान आहात की- अत्यंत उत्तम प्रकारच्या शिक्षकांच्या आणि विद्यालयाच्या माध्यमातून तुमच व्यक्तिमत्व विकसित होत आहे- त्याचं सोनं करण्याची संधी आपण निश्चित घ्याल आणि भविष्यातील उत्तम नागरिकत्व स्वीकारून देशाची सेवा करण्यास सक्षमपणे आपलं कर्तव्य पूर्ण करणार आहात याची आम्हाला खात्री वाटते असे मनोगत व्यक्त केले. भारतीय संस्कृतीची अभ्यासपूर्ण जाणीव विद्यार्थ्यांना करून दिल्याबद्दल शिक्षकांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले.

अमिन खान, यांनी त्यांचा विद्यालयातर्फे यथोचित सत्कार केल्याबद्दल शाळेचे मनापासून आभार मानले, विद्यार्थ्यांना अत्यंत समर्पक शब्दात शुभेच्छा देऊन त्यांच त्यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास, ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे, रेशमा फडतरे आणि राजेश बारणे हे उपस्थित होते. शाळेच्या वतीने आभार संपन्न होऊन कार्यक्रम संपला.

या कार्यक्रमास यशस्वी होण्यास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते, हा आगळावेगळा उपक्रम केल्याबद्दल त्यांच कौतुक करण्यास खरोखर आमच्याकडे शब्द अपुरे आहेत! तथापि शाबासकीची थाप-कौतुकाचे शब्द आणि मायेचा स्पर्श खूप काही सांगून जातो! हे सर्व या कार्यक्रमात व्यक्त झाल्यामुळे विद्यालयाच्या सर्व व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे चेहरे अत्यंत समाधानाने आणि आनंदाने फुललेले होते! हे वेगळ असलेलं अभियान- यशस्वी झाल्याची तीच खरी पावती होती..

Principal: *Ms Padmini Tejani*

*Vice Principal: Ms. Vaishali Shinde*
*Coordinator:Ms.Usha Tonapi*
*Anchoring:Ms.Adithi Mudliar*
*Sports Teachers Mr. Purushottam More*
*Ms.Manasi Deshmukh*.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये