ताज्या घडामोडी

येळापुरात महादेव मंदिर व हनुमान मंदीराचा जिणोॅदार संपन्न

Spread the love

कोकरुड /वार्ताहर
– येळापुर (ता. शिराळा) येथील महादेव मंदीर व हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा,कलशारोहन कार्यक्रम रविवार आणि सोमवारी उत्साहात संपन्न झाला.
ग्रामस्थांच्या लोकवर्गणी आणि देणगीतुन लाखो रुपये खर्चाचे आकर्षक महादेव मंदीर आणि हनुमान मंदीर उभारण्यात आले असून डॉ नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या हस्ते आणि शिवाजीराव केसरकर सरकार यांच्या उपस्थितीत रविवार दि.१३ रोजी महादेव आणि हनुमान मुर्तीची भव्य मिरवणूक संपन्न झाली. तर सोमवार दि.१४ रोजी सकाळी देवाचा अभिषेक त्यांनतर कलशारोहन सह धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद कार्यक्रम पार पडले.यावेळी उपसभापती बी के नायकवडी,कोकरुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!