आपला जिल्हामहाराष्ट्र

स्वातंञ्याचे ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळांच्यावतीने तिरंगा रॕली , टाळ मृदूंगाचे गजरात संपन्न …

माजी राज्यमंञी संजय तथा बाळा भेगडे म्हणाले , आज या स्वातंञ्यदिनानिमित्त आमृत महोत्सवी वर्षात मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचेवतीने राज्यात सर्वांत सुंदर दिंडीचे आयोजन केले आहे , त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

स्वातंञ्याचे ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळांच्यावतीने तिरंगा रॕली , टाळ मृदूंगाचे गजरात संपन्न …

आवाज न्यूजः मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१२प्रतिनिधी.

स्वातंञ्याचे ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळांच्यावतीने वडगावात ता.१२ रोजी सकाळी साडेदहा वा भव्य तिरंगा रॕलीचे ,भजन दिंडीचे टाळ मृदूंगाचे गजरामधे आयोजन करण्यात आले होते.
मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार भसे व मंडळाचे सचिव रामदास पडवळ यांनी तसेच मान्यवरांचे हस्ते श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार आर्पण करण्यात आल्यानंतर तिरंगा रॕलीला प्रारंभ झाला. ज्ञानोबा माऊली ! ! ज्ञानोबा तुकाराम ! ! भारतमाता की जय ! ! छञपती शिवाजी महाराज की जय ! ! अशा घोषणाँनी भजन दिंडीमधील वारकऱ्यांचे आवाजाने परिसरात चैतन्य आले होते.

या वर्षी आपण स्वतंत्र भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे झाल्याबद्दल संपूर्ण देशात अमृतमहोत्सवी वर्ष साजरे कण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून तिरंगा ध्वजाचे प्रचारासाठी आज या निमित्ताने मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने ही रॕली , भजन दिंडीमधील वारकऱ्यांचेवतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मावळ भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर , माजी राज्यमंञी संजय तथा बाळा भेगडे , पंढरपूर बांधकाम समिती अध्यक्ष माऊली शिंदे , माजी पंचायत समिती सभापती राजाराम शिंदे , माजी पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर , प्रविण चव्हाण , विद्यमान नवनिर्वाचित स्विकृत नगरसेवक, सदय्य , महिला सदय्य , वारकरी म्हणून निवडून आलेले श्रीरंग चव्हाण , श्री पोटोबा देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ सोपानराव म्हाळसकर , तसेच सचिव अनंता कुडे , तसेच अनेक विश्वस्थ मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंहजी राजपुरोहीत ( व्यास ) यांच्या मार्गदर्शनाखाली व ह.भ.प. संतोषजी कुंभार यांच्या सहकार्याने शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमास मावळ तालुका दिंडी समाज सेक्रेटरी विकास महाराज खांडभोर , अखील भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर , तालुकाध्यक्ष दत्ता महाराज शिंदे , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे पवनमावळ विभागीय अध्यक्ष शांताराम लोहर, विभागप्रमुख गणपत पवार , आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक वारिंगे , मावळ विभागीय अध्यक्ष देवराम सातकर , आरोग्य विभाग तालुकाध्यक्ष , संघटक सुनिल महाराज वरघडे , वारकरी सांप्रदायाचे उपाध्यक्ष दिलीप वावरे , सचिव रामदास पडवळ , खजिनदार भरतशेठ येवले , कार्याध्यक्ष शिवाजी पवार , कायदेशीर सल्लागार अॕड. सागर शेटे , सदय्य बजरंग घारे , शांताराम गायखे , लक्ष्मण ठाकर , दिपक वारिंगे , आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री.वरघडे यांनी भाषणातून सांगितले , की भारतातील असंख्य नररत्नांनी देशाचे स्वातंञ्याचे करीता बलीदान दिले , त्या नंतर हा देश स्वतंत्र झाला. आमृत महोत्सवी ७५ वे वर्षपूर्तीनिमित्त हा मोठ्या दिमाखात साजरा होत आहे.सारे भारतीय लोकांना घरागरावर तिरंगा लावण्याची संधी यावर्षी मिळत आहे. शतक महोत्सव पाहण्याचे सर्वाना भाग्य मिळेलच असे नाही ! ! अमृत महोत्सवी स्वातंञ्यदिनाचे आपण साक्षीदार असणार आहे.सर्वांनी तिरँगा झेँड्याचा योग्य मान राखून तो आपल्या घरावर उभारावा, ही विनंती .
यावेळी माजी राज्यमंञी संजय तथा बाळा भेगडे म्हणाले , आज या स्वातंञ्यदिनानिमित्त आमृत महोत्सवी वर्षात मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचेवतीने राज्यात सर्वांत सुंदर दिंडीचे आयोजन केले आहे , त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
तालुका रोजी सकाळी दहा ते बारा वाजता वाजता वडगाव मावळ येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
कोथुर्णे येथील सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घून पणे हत्या केल्यामुळे त्या पीडीत चांदेकर कुटूंबाचे घरी जाऊन राज्याचे उपमुख्यमंञी व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडून सांत्वन करण्यात आले व पीडीत कुटूंबातील जनार्धन चांदेकर यांचेकडे आर्थिक मदत म्हणून पाच लाखांचा निधी सुपूर्त करण्यात आला. अशा घटना वारंवार घडू नयेत , म्हणून आपल्या घरी येणाऱ्या पाहुणे व इतर कोणीही आले , तर त्याबाबत सर्वांनी जागक राहावे .

यावेळी विकास महाराज खांडभोर यांचेकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनीही विचार मांडले.
यावेळी नवनिर्वाचित वडगावचे स्विकृत नगरसेवक श्री.चव्हाण यांचा शाल , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ….समाप्त..
वडगावचे भूमिवर ज्यांनी इंग्रजांना धूळ चारली , गुडघे टेकायला लावले ते श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या तिरंगा याञा व भजन दिंडी टाळ मृदूंगाचे गजरात मार्गस्थ झाली.. या भजन दिंडीचा समारोप श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ झाला.
या तिरंगा यात्रेसाठी मंडळाचे सर्व कार्यकारिणी, विभागीय अध्यक्ष, विभाग प्रमुख, ग्रामप्रतिनिधी व सर्व मावळवासिय वारकरी बंधु- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला.
वारकरी सांप्रदायाचे वतीने निमंत्रक अध्यक्ष नंदकुमार शिवराम भसे व सुनिल महाराज वरघडे यांनी सूञसंचालन केले . तसेच आभार वारकरी सांप्रदायाचे कायदेशीर सल्लागार सागर शेटे यांनी   .माानल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये