आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष  सुरेशजी धोत्रे  यांच्या वाढदिवसानिमित्त आज तळेगाव स्टेशन येथे वृक्षारोपण..

तळेगाव स्टेशन येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील गार्डन मध्ये, वटवृक्ष रोपण करण्यात आले..

Spread the love

आवाज न्यूज:  तळेगाव स्टेशन २४ ऑगष्ट 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष  सुरेशजी धोत्रे  यांच्या वाढदिवसानिमित्त आज तळेगाव स्टेशन येथे त्यांच्या राहत्याघरी शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवरांनी हजेरी लावली, त्यामध्ये पुणे जिल्ह्याचे नेते, बबनराव भेगडे, माऊलीदाभाडे, मा.नगरसेवक दिलीप खळदे, अरूण माने, गोपाल परदेशी, अयुब सिकिलकर, रोटरी क्लब सिटीचे, पदाधिकारी, मयुर राजगुरव, शंकर भेगडे, देविदास नागुलपेल्ली, वसंतराव खंडागळे, व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

तळेगाव प्रेस फाउंडेशन च्या वतीने ,अध्यक्ष अमिन खान, विलास भेगडे, राजेश बारणे, केदार शिरसाठ व पत्रकार बंधुनी  पुष्पगुच्छ देऊन सुरेश धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष  सुरेशजी धोत्रे  यांच्या वाढदिवसानिमित्त आज तळेगाव स्टेशन येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील गार्डन मध्ये, वटवृक्ष रोपण करण्यात आले जेणेकरून वटपौर्णिमेला कॉलनीतील महिलांना पूजन करता येईल. वृक्षारोपण करताना शैलजा काळोखे, विना करंडे,  अनुजा धोत्रे, व महिला भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे नियोजन,  डॉक्टर मिलिंद निकम, तेजस धोत्रे, संजय चव्हाण, मिलिंद धोत्रे, श्रीप्रसादन भरड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!