महाराष्ट्र

वडीवळे अंडर पास भासतोय जलतरण तलाव

कामशेत : (अथर्व अग्रहारकर) मागच्या काही दिवसांपूर्वी कामशेत कडून वडीवळे कडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेट जवळ भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. कामशेत येथे वडीवळे गावाकडे जाण्यासाठी लोहमार्गाखालून भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. मात्र या कामाला बरेच महिने उलटूनही भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले  नाही. पुलाखालील रस्त्याचे काम करण्यासाठी रेल्वे कडून उशीर होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

काम सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी कामशेत रेल्वे विभागाशी वारंवार संपर्क साधला आहे. कामशेत येथील भुयारी मार्गाचे काम सुरू होणार म्हणून वडीवळे गावाकडे जाणारी वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

“कामशेत येथे भुयारी मार्गाचे काम सुरू करून बरेच महिने उलटून देखील काम पूर्ण होत नाही त्यामुळे वडीवळे मधील नागरिकांना वाहतूक वळवल्यामुळे नाहक त्रास सहन करून जास्त खर्च करावा लागतो आहे. त्यात आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे त्यामुळे चालू असलेल्या कामात पाणी साठून जलतरण तलावाचा भास होत आहे.” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक मनोज जगताप यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये