ताज्या घडामोडी

मयेकर महाविद्यालयात स्वावलंबनासाठी कौशल्य-विकासावर आधारित शिक्षणक्रम सुरू करण्याची चेअरमन बंधू मयेकर यांची घोषणा

Spread the love

जाकादेवी/संतोष पवार
रत्नागिरी तालुक्यातील चाफे मयेकर महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखली असून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन पदवीधर होत आहेत‌. कै. डॉ.नानासाहेब मयेकर आणि मयेकर कुटुंबीयांनी लावलेल्या रोपट्याचे, शैक्षणिक संकुलाचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर होताना दिसत आहे, याचा मला आनंद आहे.आपणा सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी माझी शिक्षण संस्था करत आहे.

विद्यार्थांबरोबरच पालक, ग्रामस्थ यांचेही उत्तम सहकार्य मिळत आहे.विदयार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य अतिशय चांगली मेहनत घेत आहेत,या वर्षापासून आपल्या महाविद्यालयात कौशल्य-विकासावर आधारित व्यवसाय-उद्योगाचे शिक्षण देण्याचा माझा मानस असून बेकारीवर मात करण्यासाठी आणि स्वावलंबनाच्या दृष्टीने पदवीधर झाल्यानंतर प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी कौशल्य विकासावर आधारित शिक्षणक्रम सुरू करण्याचा मनोदय असल्याचे मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी व्यक्त केला.
चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय विचार व्यक्त करताना बंधू मयेकर बोलत होते. कौशल्य विकासावर आधारित शिक्षणक्रम सुरू करण्याचा संकल्पाचे उपस्थित विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले. शिक्षण संस्थेची ध्येय-धोरणे विशेद करताना बंधू म्हणाले की, मयेकर विद्यालय असो, कनिष्ठ महाविद्यालय असो किंवा महाविद्यालय असो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतेही शिक्षण,उपक्रम कमी पडणार नाही, अधिक त्यात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करून गुणवत्ता संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक, प्राध्यापक यांचे बंधू मयेकर यांनी मनापासून कौतुक केले.
यावेळी माजी सरपंच सुभाष रहाटे, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक किशोर पाटील यांनीही मयेकर शिक्षण संस्थेचे तसेच डॉ.नानासाहेब मयेकर यांचे दूरदृष्टीचे शैक्षणिक-सामाजिक कार्य अधोरेखित करून वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या.
चाफे मयेकर महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला तो पुढीलप्रमाणे-
विस्तार विभागातर्फ रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील निशांत दिलीप धनावडे, पवन सुनिल माचिवले, अक्षय शंकर घाणेकर, द्वितीय क्रमांक तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील प्राची उमेश निवळकर, कल्याणी राजेंद्र विचारे, अक्षता बळवंत साळवी, तृतीय क्रमांक तृतीय वर्ष कला शाखेत अभिजीत राजन गोताड, कपिल दिलीप जाधव , सागर सुरेश घाणेकर व उत्तेजनार्थ क्रमांक द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील चैताली नामदेव गावडे, तनुश्री नंदकुमार धातकर, प्रज्योती पांडुरंग पावरी, यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यश रविंद्र लवंदे ,द्वितीय क्रमांक अक्षय शंकर घाणेकर तृतीय क्रमांक पूर्वल चंद्रकांत तावडे, उत्तेजनार्थ दर्शना सुरेश जुवळे यांनी मिळवला .
पर्यावरण विभागातर्फे पुष्पगुच्छ रचना स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पल्लवी दीपक शितप, द्वितीय क्रमांक अथर्व अभय डिंगणकर, तृतीय क्रमांक निशांत दिलीप धनावडे, उत्तेजनार्थ अमोल संतोष रायकर.
महिला विकास विभागातर्फे पाककला स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक मृणाली दिलीप पालकर, द्वितीय क्रमांक प्राची उमेश निवळकर तृतीय क्रमांक गायत्री राजेंद्र जाधव यांनी मिळवला. त्याचबरोबर महिला विकास कक्षाद्वारे हस्तकला आणि राखी विक्री प्रदर्शन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य संपादन केलेल्या तृतीय वर्ष कला शाखेत प्रथम क्रमांक निरंजन नंदकुमार नवेले 9.40 (A+), द्वितीय क्रमांक सोनाली सुरेश गोणबरे हिला 8.63(A), तृतीय क्रमांक अद्वेत किसन नेवरेकर 8.59 (A)त्याचबरोबर तृतीय वर्ष वाणिज्य शाखेमधून प्रथम क्रमांक रोशन नारायण बाचरे 9.35 (A+), द्वितीय क्रमांक अमित अनंत वीर 9.08 (A+), तृतीय क्रमांक सुरभी प्रकाश देसाई 9.03 (A+) व ज्योती सागर थापा 9.03 (A+) श्रेणी प्राप्त करून यशाचे मानकरी ठरले.
कै.डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या धडपडीतून अणि दूरदृष्टीतून चाललेले शिक्षण संस्थेचे कार्य अनेकांच्या जीवनाला संजीवनी देणारे आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदवीनंतर स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्यावर आधारित उद्योग- व्यवसायाचे शिक्षण महाविद्यालयात सुरू करण्याची जाहीर घोषणा चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी या वर्धापन दिनानिमित्त केली.
या वर्धापनदिनी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सक्रिय सचिव विनायक राऊत , संचालक किशोर पाटील, चाफे गावचे सरपंच सौ.गोवळकर,माजी सरपंच सुभाष रहाटे, मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋुषिकेश मयेकर, श्रीमती शिरिषा मयेकर,संचालक श्री. सुरेंद्र माचिवले, श्रीकांत मेहेंदळे, महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य श्री. गणेश कुळकर्णी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, सुनिल मुरारी मयेकर ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री महेश धनावडे, विद्यार्थी वर्ग व मोठ्या संख्येने पालक वर्गही उपस्थित होता.यावेळी अनेक मान्यवरांनी कै. डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या कारकिर्दीचे स्मरण करून मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेच्या देदीप्यमान कामगिरीचे कौतुक केले. वर्धापन दिनाचा प्रारंभ कै.डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!