ताज्या घडामोडी

आरळा येथे काँक्रीटीकरण रस्त्याचे उदघाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / आरळा (ता. शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी २५/१५ योजनेतून मंजूर केलेल्या मुख्य रास्ता ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत पूर्ण झालेल्या काँक्रीटीकरण रस्त्याचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. या रस्त्यासाठी ८ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी भूषण नाईक, विश्वास कारखाण्याचे संचालक शिवाजी पाटील व अनिता चौगुले, माजी सरपंच व संजय गांधी योजना समिती सदस्य निलोफर डांगे, कोंडीबा चौगुले, महिला उपाध्यक्ष हसीना डांगे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ बडदे, विशाल पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!