ताज्या घडामोडी

देववाडी येथे विविध विकास कामांसंदर्भात बैठक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / देववाडी (ता. शिराळा) येथील विविध विकास कामांच्या संदर्भात बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक होते. बैठकीस नागरिकांच्या व युवकांच्या समस्या, मागणी असलेली विकास कामे आदींबाबत मनमोकळी चर्चा झाली. बैठकीस विश्वास कारखान्याचे माजी संचालक बाबुराव नागरे, माजी सरपंच सचिन नांगरे, गजाभाऊ चव्हाण, डॉ. खोत आदी मान्यवर व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बैठकीनंतर ज्या ४ युवकांचा वाढदिवस होता त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष नाईक यांनी केक कापला. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!