ताज्या घडामोडी

काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ती हाटील…… बघायला एकदा यायलाच लागतंय…

Spread the love

कोकरुड/प्रतापराव शिंदे
आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटी मधील बघितलेल्या सौंदर्यचे वर्णन ‘काय ती झाडी ! काय ते डोंगार !काय ती हाटील…… सगळं ओके म्हदी हाय….. हे वाक्य उच्चारले होते. सध्या हे वाक्य महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. परंतु ह्याच सेम टू सेम वर्णनाचे सौंदर्य आपल्या सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात आपणाला नक्कीच पहायला मिळेल…………….

.ते म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर. शिराळा तालुक्याला मिनी कोकण म्हणून ओळखले जाते. शिराळ्या पासून पावलेवाडी खिंडीतून जस जसे पुढे जाऊ तस तसे आपणास निसर्ग सौंदर्याची अनुभूती यायला सुरुवात होते. शेडगेवाडीतुन पुढे जाताना उत्तरेला असणारी उंचच्या उंच सह्याद्रीची पर्वतरांग….. दक्षिणेला संत वाहणारी वारणामाई याच सौंदर्य पहाताना निखळ आनंद मिळतो.चांदोली परिसराची खरी अनुभूती यायला सुरुवात होते ती आरळ्यापासुन दोन्ही बाजूला निसर्ग सौंदर्याने नटलेले गर्द हिरव्या रंगाची झाडीचे उंचच्या उंच डोंगर, अधुन मधुन झाडावरून आवाज देणारे मोर , पावसाळ्यात एकावर एक कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, छोटे छोटे वाहणारे धबधबे पाहताना मन आनंदाने चिंब झाल्याशिवाय राहत नाही. चांदोली राष्ट्रीय उद्यानातून आत सैर करताना ऊन सुध्दा खाली येवू न देणारी वेगवेगळ्या प्रकारची झाडी मध्येच दिसणारे सांबर, गाणं गाणारी कोकीळा,ईतर पक्षांचा किलबिलाट मन मोहून टाकतो. आणि जाधववाडी येथील चांदोली राष्ट्रीय उद्यान गेट जवळ असणारे अविट चविचे निसर्गाच्या निसर्गाच्या सान्निध्यातील राहण्याची व भोजनाची फायस्टार हाॅटेल सारखी अनुभूती देणारे कलात्मक पद्धतीने पर्यटकांच्या सोयीसाठी साडेचार एकर मध्ये कै.सुधीर पाटील, सुनिल चव्हाण, डॉ.अतुल मोरे यांनी उभारलेले ‘ चांदोली रिसॉर्ट’ पाहील्यावर आपल्या तोंडून ही काय ती झाडी काय ते डोंगार काय काय ती हाटील असे वाक्य बाहेर पडल्यावर वावग वाटू नये असा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आपण पहाल तर थक्क व्हाल ….पण यासाठी एकदा चांदोली ला यायलाच हवं..चांदोली परिसरातील डोंगरावरील घनदाट झाडी व याच सानिध्यात असणारे चांदोली रिसॉर्ट (छाया प्रतापराव शिंदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!