महाराष्ट्र

आयुक्तांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” चिपळूण आणि महाड येथे पाठवावे – माधव पाटील

पिंपरी चिंचवड : पावसाने आणि पुराने कोकणात थैमान घातले आहे. त्यात महाड आणि चिपळूण शहराची अवस्था खूपच बिकट आहे. आपण सर्वजण कोकणचे हापूस आंबे अगदी चवीने आणि आवडीने खातो, कोकणात फिरायला जातो. पण आपला आणि कोकणचा संबंध फक्त मौज -मजा पुरता न ठेवता सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, सुखदुःखात एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे. म्हणूनच,आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सुद्धा कुशल कर्मचारी आहेत, साफ-सफाईची सुसज्ज यंत्र-सामुग्री आहे. म्हणून आपल्याच कोकणच्या बंधू- भगिनिंची मदत करण्यासाठी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” चिपळूण आणि महाड येथे पाठवावे.  पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

नुकतेच मुंबई महानगरपालिकेने कोल्हापूर येथे मदतकार्यासाठी आपले पथक पाठवले आहे. या टीमसोबत आम्हा काही सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना सहभागी व्हायला आवडेल.चिपळूण आणि महाड इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे “साफ-सफाई मदत पथक” पाठवल्याने असे केल्याने सामाजिक सलोखा, एकोपा वाढण्यास नक्की मदत होईल. आपण असे पथक पाठवले तर या निर्णयाचा पिंपरी चिंचवडकरांनासुद्धा नक्की आनंद होईल, ते या निर्णयाचे स्वागतच करतील असे माधव पाटील यांनी या पत्रात म्हंटले आहे. माधव पाटील यांनी इमेल आणि ट्विटच्या माध्यमातून हे पत्र आयुक्तांना पाठवले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अनेक कोकणवासीय वास्त्यव्यास आहेत.या शहराच्या वाढीसाठी कोकणवासियांनीही आपला खारीचा वाटा उचलला आहे.आयुक्तांनी तत्परतेने या पत्राची दखल घ्यावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये