आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

औंढे औंढोलीत घरे व शेतांच्या नुकसानीचे ग्रामसेवकाकडून पंचनामे

Spread the love

लोणावळा :औंढे औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे ग्रामसेवक आर एस.जोशी यांचेकडून घरांच्या व शेतांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही लोकांच्या घरी जावून तसेच काही शेतकरी यांचे बांधावर जावून पंचनामे करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध वाहून गेले काहींचे मूठ गेले ;तर काही शेतकऱ्यांच्या शेतामधील भाताचे पीक वाहून नुकसान झाले.अतिवृष्टीमुळे अनेक लोकांच्या घराच्या भिंती पडल्या , तसेच अनेक लोकांच्या पञाला तडे गेल्यामुळे नुकसान झाले.

मागील वर्षी अनैक शेतकऱ्यांच्या घरांचे निसर्ग वादळात नुकसान झाले होते. त्याबद्दल काहींना महाआघाडी सरकारने भरघोस मदत दिली होती. अनेकांना ३५ हजार ;तर अनेकांना ६० हजारापर्यत नुकसानीची भरपाई मिळाली होती.काही लोकांना माञ आर्ज महसूल खात्याकडे न गेल्यामुळे नुकसानभरपाई मिळाली नाही. खरोखरच ज्या लोकांची नुकसान झाली आहे, त्यांनी यावर्षी तरी नुकसान भरपाई मिळावी , अशी अपेक्षा आघाडी सरकारकडे केली आहे.

औंढोलीत शेतकऱ्यांच्या घरांचे व शेतातील भातपिकांचे नुकसान झाल्यावर शेती करायची कशी व जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!