आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

पीएमआरडीए विकास आराखड्याला असणा-या हरकती व सूचना शेतकऱ्यांनी नोंदवाव्यात – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

Spread the love

तळेगाव : पीएमआरडीए विकास आराखड्याला असणाऱ्या हरकती व सूचना नोंदविणा-याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. तरी 28 ऑगस्टपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी हरकती नोंदवाव्यात जेणेकरून याबाबत शेतक-यांना असणा-या शंकाबाबत न्याय मागण्यासाठी पाठपुरावा करता येईल असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील गावांचा प्रारुप आराखडा राज्य शासनाच्या माध्यमातून 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आराखड्याला विरोध दर्शविण्यासाठी आज कार्ला ग्रामपंचायतीच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

संबंधित शेतकऱ्यांनी व नागरिकांनी 28 ऑगस्ट पर्यंत याबाबतच्या हरकती व सूचना नोंदवाव्यात. भारतीय जनता पक्षाच्या वडगाव मावळ येथील कार्यालयामध्ये यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे भेगडे यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!