आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

तळेगाव नगरपरिषद शाळेतील 5 विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी

 

तळेगाव : येथील नगर परिषदेच्या वीर जिजामाता कन्या शाळा, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा व लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा या 3 शाळेतील 5 विद्यार्थिनींनी (एनएमएमएस) ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक’ शिष्यवृत्ती स्पर्धेत बाजी मारली आहे.

 

सारिका संजय वाघमेहत्तर, साक्षी संतोष ओव्हाळ, तन्वी सहदेव सूर्यवंशी,अनुष्का संभाजी मंमाळे, आकांक्षा बाळू डामसे या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या या पाचही विद्यार्थिनींना त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा 1000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

6 एप्रिल रोजी शैक्षणिक वर्ष 2020-21साठी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत या विद्यार्थिनींनी हे यश संपादन केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी एस. एम. गावडे, मार्गदर्शक, शिक्षक व मुख्याध्यापक, सांस्कृतिक व क्रीडा समिती सभापती अनिता पवार,वीर जिजामाता प्राथमिक कन्याशाळा क्रमांक. ५ च्या वर्ग शिक्षिका बेबी प्रकाश जाधव, मुख्याध्यापिका शोभा कांबळे, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक.६ वर्गशिक्षक दत्तात्रय कोकाटे, मुख्याध्यापक रमेश सोनेकर ,लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक.३ वर्गशिक्षिका अनुष्का भोसले, मुख्याध्यापक केशव चिमटे, महाराष्ट्र राज्य नपा मनपा शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी , तळेगाव दाभाडे नपा शिक्षक संघ अध्यक्षा विजया दांगट, सचिव अनिता तिकोने यांनी तसेच तळेगाव दाभाडे शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभापती राजेंद्र शिंदे व सचिव संजय चांदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये