
सामाजिक उत्तरदायित्व जपणारे मंडळ,
तळेगाव दाभाडे येथील कान्होबा मित्र मंडळ. Board for Social Responsibility,Kanhoba Mitra Mandal at Talegaon Dabhade.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ सप्टेंबर.
सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील
कान्होबा मित्र मंडळाची स्थापना १९७३ मध्ये झाली.
मंडळाने यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंडळाच्या वतीने नवनाथ भक्ति कथासार पारायण सोहळा, श्रीकृष्ण जन्मसोहळा, दहीहंडी कार्यक्रम, अथर्वशीर्ष पठण, भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
विविध धार्मिक कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो.
गणेशोत्सव साजरा करताना ; गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर अशा सामाजिक उपक्रमाची जोड मंडळाकडून दिली जाते. कोणालाही रक्ताची गरज भासल्यास मंडळाचे कार्यकर्ते पुढाकार घेतात.
यावर्षी मंडळाने विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मंडळाचे आधारस्तंभ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,गणेश किसनराव भेगडे आहेत.तर अध्यक्ष चरण (बबलू) भेगडे, कार्याध्यक्ष ओंकार भेगडे,उपाध्यक्ष पृथ्वी भेगडे,सचिव वेदांत भेगडे,खजिनदार शुभम भेगडे, सहसचिव प्रणव भेगडे आहेत.संतोष किसनराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्वच कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
(चरण (बबलू) भेगडे, अध्यक्ष. कान्होबा मित्र मंडळ)
मंडळाची विशेष बाब म्हणजे, वर्गणी फक्त मंडळांच्या सभासदांकडूनच घेतली जाते. समाजाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी तिचा विनियोग केला जातो. यावर्षी मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मंडळाच्या ४० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.दरवर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचे.
चरण (बबलू) भेगडे, अध्यक्ष. कान्होबा मित्र मंडळ, यांनी आवाज न्यूजशी बोलताना व्यक्त केले.