आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

लोणावळ्यातील एकाच सोसायटीत दोन घरफोड्या; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

Spread the love

लोणावळा : शहरातील मध्यवर्ती भागातील निसर्ग नगरी सोसायटीत दोन घरफोड्या झाल्या आहेत. दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरफोडी करण्यात आली. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी एकूण 3 लाख 57 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

ही घटना मंगळवार (दि. 24 ऑगस्ट) रोजी सायंकाळी 4 ते बुधवार (दि. 25) रोजी सकाळी 11च्या सुमारास घडली. या प्रकरणी सुरेखा भीमा शिंदे (वय 65 ,राहणार निसर्ग नगरी सोसायटी) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निसर्गनगरी सोसायटीतील बिल्डिंग नं. 11 मधील सुरेखा भीमा शिंदे यांच्या फ्लॅट नंबर 2 चे दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी कापडाच्या गाठोड्यातील गौरी गणपतीचे दागिने, दोन चांदीचे मुखवटे, देवीचे सोन्याचे दोन लक्ष्मीहार, तीन चांदीचे मुगुट, देवीच्या गळ्यातील दोन वाट्या, सोन्याचे नेकलेस, गणपतीच्या गळ्यातील सोन्याची चैन, दोन कमरपट्टे, अंगठ्या, चांदीच्या साखळ्या असा एकूण 2 लाख 26 हजारांचा ऐवज लंपास केला.

तर त्याच सोसायटीतील बिल्डिंग नंबर 6 मधील दीपक नंदकुमार अग्रवाल यांच्या घराचे दरवाज्याचे कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, मिनी गंठण, कानातील टॉप्स, अंगठी, घड्याळ एकूण 1 लाख 31 हजारांचा ऐवज लंपास केला. दोन्ही ठिकाणी मिळून 3 लाख 57 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर हे तपास करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!