डाॕ.बी.एन. बहुविध विद्यालयाचा माजी विद्यार्थांचा जमला मेळा.
गुरूजणांप्रति आदर, प्रेम आणि स्नेहजिव्हाळा ..

डाॕ.बी.एन. बहुविध विद्यालयाचा माजी विद्यार्थांचा जमला मेळा; गुरूजणांप्रति आदर, प्रेम आणि स्नेहजिव्हाळा ..Dr. B.N. Polytechnic Alumni Gathering; Respect, love and affection towards Guruji..
आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २० नोव्हेंबर.
डाॕ .बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालयाचा माजी विद्यार्थांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे अनेक विद्यार्थी भारताच्या भूदल, वायूदल व नौदलामधे देशाची सेवा करीत आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो, अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील, न्यायमुर्ती झाले. विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवत असल्याने जीवनाचे सार्थक झाले, असे डाॕ .बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ पाटील सर यांनी माजी विद्यार्थी महामेळाव्यात उद्गार काढले.
गुरूजणांप्रति आदर , प्रेम आणि स्नेहजिव्हाळा येथे माजी विद्यार्थांनी व विद्यार्थीनी यांनी पार पाडले. यावेळी माजी विद्यार्थी , यांची मनोगते झाल्यावर गुरूपुजन झाले.सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा , शिक्षकेतर कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.सत्कार करण्यात आला.
सन १९६० ते २०२३ चे सुमारे आठशे ते हजार माजी विद्यार्थी शाळेतील आठवणीमधे रमले. सर्वांनी गप्पागोष्टी , एकञ स्नेहभोजन , ग्रूप फोटोग्राफी , चहापान आणि भारत व आॕस्ट्रेलिया मॕचचाही मनमुराद आनंद सर्वांनी मोठ्या स्क्रीनवर घेतला. भारताची बॕटींग पाहण्यात व गप्पा , आठवणीमधे सर्व जण रमलेले होते.
यावेळी सुमारे तेवीस वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले गुरूवर्य दिनानाथ सिताराम पाटीलसर भाषणात म्हणाले,” मी या शाळेत रूजू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी येथे शिकले, मोठ्या उच्च पदावर गेले. मला आभिमान वाटतो, की या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी भारताच्या भूदल, वायूदल व नौदलामधे देशाची सेवा करीत आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक .दी.सी.पाटील यावेळी भाषणात म्हणाले , ” मी मुंबईला असताना एक प्रसंग घडला .माझ्या शाळेचा माजी विद्यार्थी याने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे नामवंत न्यायाधीश, वकील डाॕक्टर , विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक.पुंडेसर, कुलकर्णी सर, वामन वाघुलेसर , पाटकरबाई, चिञकला शिक्षक हिरेसर , सेवानिवृत्त लिपिक कडूसर , जाधवसर, ग्रंथपाल कडू मॕडम, शिपाई गायकवाड, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेवटी त्यांचेकडून प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवला होता. कोण कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतील, याची आपल्याला कल्पना करता येईल, इतक्या उंचीवर आपले माजी विद्यार्थी पोहोचले, याचे समाधान वाटते.यावेळी विद्यालयाचे विश्वस्थ व माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त पीटी गणिताचे शिक्षक व्ही.एन.जोशी म्हणाले , ” मी १९६० मधील शाळेचा पहिला विद्यार्थी, आम्ही आठ विद्यार्थी होस्टेललाही एकञ राहत होतो.१९६३ ला मॕट्रीकची परीक्षा दिली.
त्यावेळी मुंबईहून राञी दोन वाजता शाळेचे संस्थापक डाॕ.भालचंद्र पुरंदरे ट्रॕक्टर घेवून आले. त्यांनी शाळेची जागा सपाट करून दिली. मुंबईहून शंभर खुर्च्या आणल्या होत्या. सुमारे आडीचशे , तीनशे , चारशे इंच पाऊस असल्यामुळे आम्ही आठ ते तेरा विद्यार्थांना चार , सहा खुर्च्या नावे टाकून दिल्या.त्यावरच आमचा अभ्यास व जेवणे आणि झोपणे आसा नित्यक्रम चाले. ते पुढे म्हणाले , ” माझे मॕट्रीक ते ग्रॕज्युएशनपर्यतचे शिक्षणही संस्थेने केले.मला येथेच शिक्षक म्हणून नोकरीला घेतले.आता आजीवन विश्वस्थ म्हणून कामही करायला संस्थेने सांगितले आहे. संपूर्ण जीवन संस्थेच्या शाळेसाठी समर्पन केले आहे.
विद्यार्थांना शिकवताना सर्वच सुमारे पाच मुख्याध्यापक यांचे हाताखाली काम करायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो.यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका.पाटकर बाई यांनीही आठवणी सांगितल्या .सेवानिवृत्त मुख्याध्यापिका.वसुदा पाटील म्हणाल्या , ” ” मला तुम्हा मुलांना शिकवताना खूपच चैतन्य मिळाले. आनंद मिळाला. तसेच शाळेतील जेष्ठ शिक्षक , शिक्षिका यांचेकडून शिकायला मिळाले.माझा एक मुलगा असाला, तरी तुम्ही सारी माझीच मुले आहेत , असे मी समजते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रारंभी सरस्वतीपूजन मान्यवरांचे हस्ते झाले. प्रास्ताविक डाॕ .बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आनंद गावडे सर यांनी केले.
सूञसंचालन मनिषा जांभळे व शिल्पा पानसे यांनी केले. सरस्वती स्तवन व राष्ट्रगीत गायिका , माजी विद्यार्थीनी शिल्पा कोपरकर यांनी गायले.आभार माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी आशिश मेहता यांनी मानले.
शाळेच्या मैदानावर अत्यंत उत्साहात कार्यक्रम झाला. भव्य शामियाना उभारला होता. शाळेतील विविध प्रसंगी काढलेल्या छायाचिञांचा मंडपात खुबीने वापर केलेला होता.
: