आरोग्य व शिक्षण

पीएमआरडीएच्या आराखड्याविरोधात माजी राज्यमंत्री संजय भेगडे मैदानात

Spread the love

वडगाव मावळ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए)चुकीच्या आराखड्याविरोधात माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे मैदानात उतरले आहेत.त्यांनी त्याविरोधात सोमवारपासून (ता.३०) जिल्हा जनजागृती दौरा सुरु केला आहे. त्यात ते आणि वकिलांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत असून हरकती नोंदवून घेत आहेत.

पीएमआरडीएने ८१४ गावांचा प्रारुप विकास आराखडा २ ऑगस्टला तयार केला. त्यावर हरकत घेण्यासाठी तसेच सूचना देण्याकरिता ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण, ती पुरेशी नसल्याने ती वाढवून देण्याची मागणी मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी २७ तारखेला केली होती.त्याची दखल घेत आता तील १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. दरम्यान,या आराखड्याविषयी,त्याच्या नकाशाविषयी माहितीच नसल्याने त्याविषयी संभ्रम आहे.म्हणून त्याबाबत जनजागृती करण्याकरिता हा जिल्हा दौरा सुरु केला असल्याचे भेगडेंनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा विकास आराखडा नक्की काय आहे, त्याला हरकत कशी घ्यावी याबाबत हा दौरा तथा मेळाव्यात माहिती दिली जात आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोड आणि बुलेट ट्रेनबाबतही यावेळी मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ३० तारखेला हा दौरा सुरु करण्यात आला. हवेली पश्चिम,शिरुर,भोर, वेल्हा या तालुक्यात तो काल आणि आज झाला. उद्या तो हवेली मध्य आणि गुरुवारी (ता.२) २ तारखेला तो मावळ आणि खेड तालुक्यात होणार आहे.मावळात वडगाव मावळ येथे भेगडे लॉन्समध्ये सकाळी ११ वाजताच्या या मेळाव्याला प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. सुधाकर आव्हाड उमेश तारे हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याला शेतकरी,त्यांच्या   संघटना,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन मा.आ. बाळा भेगडेंनी केले आहे. ३ तारखेला मुळशी आणि दौंड येथे चार तारखेला  या मेळाव्याची सांगता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!