आपला जिल्हा

महाराष्ट्र वाहतुक सेना लोणावळा शहराध्यक्षपदी शांताराम ज्ञानदेव कडू

लोणावळा : महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या नुकत्याच पार पडल्या. यावेळी लोणावळा शहराध्यक्षपदी शांताराम कडू यांची नियुक्ती झाली आहे

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र वाहतुक सेना अध्यक्ष उदय दळवी  यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना समन्वयक माननीय रविंद्रजी मिर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आल्या.

वेल्हा तालुकाध्यक्षपदी बाप्पू धोंडीबा सरपाले, मावळ तालुका उपाध्यक्ष पदी बाबुराव गोविंद केदारी, मावळ तालुका सरचिटणीस पदी गणेश लक्ष्मण कदम, लोणावळा शहराध्यक्षपदी शांताराम ज्ञानदेव कडू, लोणावळा शहर रेल्वे विभाग अध्यक्षपदी हरीश हरिश्चंद्र टेंबे, चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी राज श्रीमंत गिरी, चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी महेश मनोज शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, महाराष्ट्र वाहतुक सेना पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, संगीताताई पवळे महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष बाबीर मेटकरी, तालुकाप्रमुख सचिन खैरे, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, मुळशी तालुका अध्यक्ष शैलेश पांढरे  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये