आरोग्य व शिक्षण

मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्यावतीने ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या बालगोपळांना बक्षिसे वाटप

Spread the love

वडगाव : मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्यावतीने गोकुळाष्टमी सणानिमित्त नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील बाल गोपळांसाठी ऑनलाईन वेशभूषा राबविण्यात आली .या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

वेशभूषा स्पर्धेतील ० ते ३ वयोगट नुसार रिदीशा योगेंद्र ठोंबरे,  दर्शिल अमित बोठे,  यशराज चौधरी ,वयोगट ४ ते ६  श्लोक चंद्रशेखर जाजू , संस्कृती अनंत शेलार, अक्षय नवनाथ नरूटे आणि ७ ते १० या वयोगटातील  अपूर्वा अशोक चव्हाण, रुद्र मारूती सौर्वगौड,  समर्थ संजय जाधव हे स्पर्धक विजयी झाले.

माझ्या दृष्टीने खरे तर सर्वच स्पर्धक विजयी आहेत पंरतु स्पर्धा म्हणली की निकाल हा आलाच आणि हि प्रक्रिया पूर्ण पाडावीच लागते.विद्यार्थी वर्गाच्या कला गुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे नगराध्यक्ष मयुर ढोरे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला  मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव तसेच विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!