ताज्या घडामोडी

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांना छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित..

Spread the love

नवी मुंबई : दैनिक झुजार केसरी च्या माध्यमातुन राजकिय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक,कला-क्रिडा,उद्योग,शिक्षण या विविध.क्षेत्रामध्ये काम करणार्या मान्यवरांना पुरस्कार देण्याचे काम हि संस्था करत आहे. व्यक्ति आणी संस्था यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देवुन त्यांच्या कार्याला बळ देण्याचे काम हि संस्था करत आहे.दैनिक झुजार केसरी चे पुरस्कार देण्याचे हे पहिले वर्ष आहे.महाराष्ट्रातील विविध भागातुन पुरस्करासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
यामध्ये नेरूळ मधील लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांचे कार्य प्रभावीपणे संस्थेच्या निदर्शनास आले म्हणुन त्यांना छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलं आहे अशी माहीती दै. झुंजार केसरी चे मुख्य संपादक मा.श्री मुनीर व. खान
हा सोहळा रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी जय भगवान हॉल हरि निवास सर्कल नौपाडा ठाणे (प) या ठिकाणी आयोजित करून सर्व पुरस्कार प्रदान करण्यात आहे अशीही माहीती त्यांनी दिली.

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार २०२२ मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्थरातुन त्यांचे कौतुक होत आहे.नेरुळ गांवातील नागरीकांनी  देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे बोलताना सांगितले कि जिवन जगत असताना आपण या समाजाला काही तरी देणं लागत. आणी हिच भावना मना मध्ये ठेवुन मी गेली अनेक वर्ष नेरूळ मध्ये काम करत आहे.तसे पाहीले तर कोणतही राजकिय पाठबळ नसताना समाजाची सेवा करण खुप अवघड असत.परंतु यातुनही आम्ही मार्ग काढला.आणी जे काही या समाजात वंचित घटक आहे. त्यांना मदत करत गेलो.यात  मला सर्वांची मदत झाली. आणि सर्वांच्या सहकार्याने हे काम शक्य झालं.आज जो मला  छत्रपती शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार २०२२ मिळणार आहे. त्या पुरस्काराचे खरे मानकरी माझ्या बरोबर काम करणारे माझे सर्व सहकारी या आहेत.या कोरोना महामाराच्या काळामध्ये आम्ही लोकांना मोफत मास्क पुरवले, सॅनिटायझर पुरवले,तसेच अनेक ठिकाणी रोशन देखील पुरविले आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, ५०℅ सवलत चे हेल्थ कार्ड वाटप , अल्बम३०गोल्याचे  वाटप, पुरग्रर्ताना मदत करणे .या कामी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सदस्य चे खुप असे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.हा पुरस्कार मला देवुन माझ्या संस्थेचा व माझ्या कार्याचा गौरव केल्याबद्दल मी दै. झुंजार केसरी चे मुख्य संपादक मा.श्री मुनीर व. खान यांचे मी आभार ही मानतो. तसेच या कार्यक्रमा प्रसंगी दै. प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर, रिपब्लीकन बहुजन सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे , हाप फांऊंडेशन मुबंई अध्यक्ष डॉ. प्रविण निचत , कवि विलास खानविलकर आदि मान्यवर महोदय उपस्थित होते.

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!