महाराष्ट्र

प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक डाॅ. प्रशांत गेडाम यांची चित्रपट अनुदान समितीवर नियुक्ति

Spread the love

मुंबई : गोड मनाचा माणूस म्हणून सर्व दूर परिचित असणारे प्रसिद्ध लेखक पटकथा लेखक व दिग्दर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ प्रशांत गेडाम यांची आज महाराष्ट्र शासनाच्या चित्रपट अनुदान समितीवर नियुक्ती करण्यात आली.

डाॅ गेडाम हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील तरूणांचे आवडते व्यक्तीमत्व आहे..कुठल्याही माहिती साठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी त्यांच्या भोवती नेहमी तरुणांचा गराडा पडलेला दिसून येतो. तरूणांबरोबरच आबालवृद्ध आणि महिला वर्गामध्ये ते आदराचे स्थान म्हणून ओळखले जातात. कलात्मक जाण आणि तळागाळातील सर्व जनसामान्यां पासून उच्च वर्गापर्यंत असणारा संपर्क, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती ही त्यांची ओळख आहे.

चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश समन्वयक संतोष साखरे, जिल्हा अध्यक्ष प्रियाताई बेर्डे व मराठवाडा विभाग अध्यक्ष डाॅ सुधीर निकम यांच्या विशेष प्रयत्नाने व त्यांचे चित्रपट सृष्टीतील, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य व सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहून त्यांची या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या नियुक्तीवर बोलताना त्यांनी आपल्या वरिष्ठ व सहकारी पदाधिका-यांचे मनापासून आभार मानून लोकनेते मा शरदचंद्रजी पवार साहेब, उप-मुख्यमंत्री मा अजितदादा पवार आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्ष मा जयंतरावजी पाटील आणि पक्षाच्या विचारधारेला तळागाळातील कलावंतापर्यंत नेवून त्यांना याचा लाभ मिळवून देण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. आज सगळीकडे त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!