आपला जिल्हा

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सभासदांचा सत्कार

तळेगाव : येथील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार (1 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 5 वाजता मंडळाच्या सभासदांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

वयाचे 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या सभासदांचा अमृत महोत्सव तर वय वर्षे 81 पूर्ण केलेल्या सभासदांचा सहस्त्रचंद्रदर्शन समारंभ कै. सौ. पुष्पावती बवले सभाग्रह, दादा – दादी पार्क पंचवटी कॉलनी येथे पार पडणार आहे.

मंडळाच्या एकूण 80 जेष्ठ सभासदांचा गुलाबपुष्प, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येईल. कोरोना नियमांचे पालन करुन अतिशय साध्या पद्धतीने कार्यक्रम पार पडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये