आपला जिल्हा

ऑक्टोबरपासून सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आपली एटीएम सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला , खातेदार काळजीने बेजार

तळेगाव : येथे सूर्वोदय स्मॉल फायनान्स बँके आपली एटीएम सेवा बंद करणार असल्याने खातेदारांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे . अडीअडचणीला पैशाची गरज भासल्यास पैसे काढायचे कसे ? हा प्रश्न त्यांच्या समोर आहे . बँकेने १ ऑक्टोबर २०२१ पासून आपली एटीएम सेवा बंद केली आहे .

या बँकेने आपल्या सेवा देण्यास २३ जानेवारी २०१७ लघु वित्त बँक म्हणून सुरु केले होते .आपली एटीएम सेवा जरी बंद केली असली तरी इतर बँकेमध्ये सूर्योदय बँकेचे एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड चालू शकेल तसेच .,या शिवाय पिन जनरेशन, फंड ट्रान्सफर, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी इत्यादी तसेच इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे या सेवा देण्यामध्ये सूर्योदय बँक कुठे ही कमी पडणार नाही .

भारतीय रिजर्व बँकेने (आर बी आय ) बँकिंग अधिनियम १९४९ च्या कलम २२ (१) अन्वये भारतातील लघु वित्त बँकांचा व्यवसाय करण्यासाठी चा परवाना जारी केला जारी केला आहे , या अंतर्गतच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक कार्यरत आहे .
लहान वित्त बँका पायाभूत बँकिंग सेवा देतील, ठेवी स्वीकारतील आणि अनारक्षित आणि अल्पभूधारक संस्था, ज्यात लहान व्यवसाय, छोटे शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग आणि असंघटित क्षेत्रातील संस्था यांना कर्ज पुरवठा करण्याचे महत्वपूर्ण काम ही बँक करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये