ताज्या घडामोडी

प्रल्हाद नलावडे स्मृती कॅरम: कौस्तुभ जागुष्टे ‘अ’गट विजेता

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती १४ वर्षाखालील विनाशुल्क ‘अ’ गट शालेय कॅरम स्पर्धेत डीपीवायए हायस्कूल -दादरचा कौस्तुभ जागुष्टे गट- विजेता ठरला.  फटकेबाजीसह अचूक खेळ करीत कौस्तुभने आदर्श विद्या मंदिर-भाईंदरच्या सिमरन शिंदेचे आव्हान २५-० असे सहज  संपुष्टात आणले. सिमरन शिंदेने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखूनही कौस्तुभ जागुष्टेच्या अप्रतिम खेळापुढे सिमरनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अविनाश स्पोर्ट्स, आरएमएमएस व स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन सहकार्याने झालेली ‘अ’ गटाची कॅरम स्पर्धा कौस्तुभ जागुष्टेच्या झंझावाती खेळामुळे गाजली. कौस्तुभने प्रतिस्पर्ध्यांना तीन-चार बोर्डात नील गेम देत भावी दरारा निर्माण केला आहे. ‘अ’ गटामध्ये  उपांत्य उपविजेते सेंट अॅन्द्रुज हायस्कूलचा यश सोळंकी व महात्मा गांधी विद्या मंदिरची तनया दळवी ठरले.

विजेत्यांना पुरस्कार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. प्रशिक्षक प्रणेश पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. ‘अ’ गटातील सर्व स्पर्धकांना प्रल्हाद नलावडे स्मृती भेट स्वरुपात स्ट्रायकर देण्यात आले. मोफत प्रशिक्षणासह ४ गटामधील स्पर्धापैकी ‘ब’ गटाची ४ जानेवारीपासून भायखळा येथे तर ‘क’ गटाची ७ जानेवारीपासून चेंबूर-गोवंडी येथे स्पर्धा सुरु होणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व पालकांच्या विनंतीनुसार संयोजकांनी उर्वरित गटांच्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!