आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकाच्या अभिवाचनानी नागझिराची सफर घडवली…

तळेगाव मधल्या यशवंत नगर इथल्या बायोडायव्हरसिटी पार्क मध्ये नागझिराच्या अभिवाचनाचा प्रयोग संपन्न..

Spread the love

व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकाच्या अभिवाचनानी नागझिराची सफर घडवली…तळेगाव मधल्या यशवंत नगर इथल्या बायोडायव्हरसिटी पार्क मध्ये नागझिराच्या अभिवाचनाचा प्रयोग संपन्न..Abhivi of the book written by Venkatesh Madgulkar made the journey of Nagzira… The experiment of Nagzira in Biodiversity Park at Yashwant Nagar in Talegaon was completed..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ मार्च.

मावळ तालुका नवनिर्माण प्रतिष्ठान व तळेगावव्यासपीठ महिला मंच आयोजित ‘नागझिरा’ या व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकाच्या अभिवाचनानी नागझिराची सफर घडवल. जंगलात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहिल्याने, एक आनंददायी अनुभव मिळाला. अशा प्रतिक्रिया आजच्या कार्यक्रमात मिळाल्या. तळेगाव मधल्या यशवंत नगर इथल्या बायोडायव्हरसिटी पार्क मध्ये नागझिराच्या अभिवाचनाचा प्रयोग झाला.

’अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनी भरभरून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. मुख्य म्हणजे कार्यक्रम बागेत असूनही प्रेक्षक जागचे हलले नाहीत. विराज सवाई आणि मी अभिवाचन केलं आणि चैतन्य जोशी यानी पार्श्व संगीताची बाजू सांभाळली. डॉ गणेश सोरटे, सचिन भांडवलकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केलं होते.

२०० ते २५० प्रेक्षक गोलाकार बसुन कार्यक्रमाचा आस्वाद घेत, प्रतिसाद देत होते. माडगुळकरांच्या चित्रदर्शी लेखनाची जादू अनुभवत असतानाच उपस्थित रसिकांना चुलीवरचा चहा देण्यात आला, चहाचा घेऊन झाल्यावर  पेपर ग्लास किंवा पाण्याची बाटलीला, इकडे तिकडे नटाकता सरळ डस्ट बिन दाखवत होते.

 

अशीच सफर पुन्हा असणारे… स्थळ आणि वेळ कळवीनच..
माडगुळकरांच्या भाषेत सांगायचं तर….
नव्या रानात शिरण्यासाठी कोणीतरी वाट बघावी लागते, नंतर त्यावरून जा – ये सुरु होते. मी लहानशी वाट पाडली आहे, एवढेच. सचिन  भांडवलकर मित्र परिवाराने आवाज न्यूज शी बोलताना सांगितले.
व अजून एका समृद्ध अनुभवासाठी उपस्थित रसिकांचे मनापासून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!