आपला जिल्हा

लोणावळ्याच्या टपरीधारकांवर नगरपरिषदेच्या वतीने कारवाई देशोधडीला लावणारा निर्णय असून लोणावळ्यात ओला उबेर फिरकू देणार नाही – आमदार सुनिल शेळके यांचा इशारा.

लोणावळा : लोणावळ्याच्या टपरीधारकांवर नगरपरिषदेच्या वतीने कारवाई देशोधडीला लावणारा निर्णय असून लोणावळ्यात ओला उबेर फिरकू देणार नाही , लोणावळा शहर पोलिसनिरिक्षक दिलीप पवार यांचेकडून ओला उबेरला विरोध करणाऱ्या रिक्षा व टॕक्सीचालक यांना धाकदपटशा आणि मारहाण होत असून त्यांची तत्काळ बदली करावी , अशी मागणी करत आमदार सुनिल शेळके यांनी दोन तास महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी पोलिस उपआधिक्षक राजेंद्र पाटील यांनी त्या पोलिस निरिक्षक श्री.पवार यांना रजेवर पाठवले असून चौकशी करून कारवाई चा निर्णय घेण्यात येईल ,आसे आश्वासन दिल्यानंतर आमदारांनी ठिय्या आंदोलन संपवले.

लोणावळा शहरातील माळी कामगार संघटना , टपरी संघटना व टॕक्सी चालक मालक संघटना यांनी आज आमदार सुनिलआण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजू बोराटी यांनी सूञसंचालन केले. तसेच भाषणातून टपरीधारकांवर होणारा आन्याय थांबविण्याची मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड , काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , गटनेत्या आरोही तळेगावकर , शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , हमाल पंचायत चे राजाराम साबळे , माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर , तसेच खंडाळातील राजमाची पाँईंटवरील टपरीचालक राधिका रोकडे , आणि पोलिसांकडून लाठ्या व पट्याने मारहाण झालेल्या अॕटोरिक्षा चालक यांनी भाषणात टपरीधारक व ओला उबेरा या ं टॕक्सीला विरोध आणि नगरपरिषदेने २००८ पासून टपरीचालक यांचा प्रश्न सोडविला नाही आसा आरोप करत भाषणात संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी जीवन गायकवाड म्हणाले , खंडाळातील धनिकांनी लाख दोन लाख देवून टपरीधारकांवर कारवाई करायला भाग पाडल्याने काही टपरीचालक रस्त्यावर आले. शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्री.खराडे म्हणाले , हा विषय टपरी चालकांवर कारवाई केल्याचा गंभीर आहे.यापूर्वी मावळ गोळीबार प्रकरण झाले. त्यावेळी पोलिस निरिक्षक लंजिले यांनी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या . त्यात तीन शेतकरी शहीद झाले ;तर एक गंभीर जखमीसह १४ जण जखमी झाले. शहीद शेतकरी मोरेश्वर साठे यांच्या मुलीचे विवाहासाठी आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी पुढाकार घेतला.व स्वतःच्या मंगल कार्यालयात लग्न लावले.

यावेळी आमदार  शेळके म्हणाले , आमच्या शहरातील आर्धशिक्षित व बेरोजगार यांनी व्यवसायाला पन्नास साठ रिक्षा घेतल्या .लाॕकडाऊन झाले. त्यांचेवर उपासमारीची वेळ आली. कुणी लक्ष दिले नाही. गाड्या कंपनीच्या माणसांनी ओढून नेल्या. ओला उबेर बंद केल्या तरच इथल्या टॕक्सीचालक व रिक्षाचालक यांचे पोटापाण्याचा व्यवसाय चालेल. टपरीधारकांवर कारवाई करतात; पण त्यांना हक्काची जागा द्या.तो बेकार झाला तर चोरी करेल. त्याला काम द्या.नाहीतर व्यवसायाला जागा द्या. ओलाउबेर बंद नाही केल्या.तसेच लोणावळा शहर पोलिस निरिक्षक पवार यांची बदली न केल्यास द्रूतगतीमार्गावर रास्तारोको करू , असा इशारा  शेळके यांनी दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे , लोणावळ्याच्या उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , काँग्रेस , राष्ट्रवादी  व शिवसेना तसेच टपरीधारक ,आणि टॕक्सीचालक , तसेच माळीकामगार आदी  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये