ताज्या घडामोडी

सावखेडा येथील चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवांत

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील  

मुंगसे ,ता . अमळनेर येथून जवळच असलेल्या सावखेडा येथील नवसाला पावणारी गांवदेवी चंडिकादेवीचा यात्रोत्सव साला-बादाप्रमाणे फाल्गुन शु .१२ रोजी शुक्रवारी दि.४ मार्च २०२ ३रोजी मोठ्या उत्साहांत सुरू होत आहे . यात्रेचे दोन दिवस अगोदर व नंतर आठवडाभर चंडीकादेवी ला अंबाडीची भाजी, अन बाजरीच्या भाकरी . चा नवस देण्याचे सत्र सुरू असते . चंडिकादेवीचे जागृत देवस्थान असुन, नवसाला पावणारी चंडिकादेवी प्रसिध्द आहे . या यात्रेस परिसरांतील मुंगसे , धावडे , नांदेड .पातोडा, दापोरी, निमग०हाण, तांदळवाडी, खाचणे, रुंधाटी, मठग०हाण, रोटवद, साळवा _ आदी गांवातील भाविक व बाहेरगांवी नोकरीनिमित्त गेलेले भाविक , लग्न झालेले नविन जोडपे ‘ येऊन नवस देत आपले मनोरथ पूर्ण करीत असतात
*देविच्या यात्रे विषयी आख्यायिका, अशी की ,रणरागिणी, रेणुका ‘, चंडीका, भवानी . सप्तशृंगी, एकविरा देवी . तुळजा भवानी ही अशी पार्वती मातेची रूपे आहेत . त्यातीलच हे एक चंडीका मातेचं रूप असून पुर्वीपासून देवीची गांवाबाहेर निंबाच्या झाडाखाली उघड्यावर स्थापना होती . काही दिवसांनी देवी सोनवणे वाडयातील हिराजी लोटू सोनवणे यांच्या स्वप्नात येऊन, दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी दि .५ / ८ / १९५१ साली चंडीका . देविचे मंदीर स्वखर्चाने बांधून दिले . त्या दिवसापासुन देवीचा यात्रेस सुरूवांत झाली आहे .
*विषेश म्हणजे महाराष्ट्रांत अशी एकच देवी आहे की , या देवीस कोंबडा ,-बोकड किंवा खर्चिक असे काहीही नवस फेडण्यास लागत नाही . या देविच्या नवसांला लागते . फक्त्त अंबाडीची भाजी अन् बाजरीच्या भाकरी !गरीबातला गरीब माणूस सुध्दा हा नवस सहजपणे फेडू शकतो . अशी ही नवसाला पावणारी गांवदेवी चंडीकामाता हे एक जागृत देवस्थान असून भाजी भाकरीचा नवस देऊन भाविक भक्तगण आपले मनोरथ पूर्ण करीत असतात . मंदीराची पुजाविधी अशोकभट व रामु कुलकर्णी तसेच सौ सुनिता कुलकर्णी हे दररोज अंघोळ स्नान . व दिवा बत्ती हे करीत असतात.या जुण्या मंदिराचा नुकताच लोकवर्गणीतून जिर्णोध्दार करण्यात आला आहे . देवीची सुंदर व आकर्षक अशी मुर्ती व मंदीरांची वास्तू साक्ष देत आहे.
यात्रानिमित्त बस स्टॅंड पासुन ते मंदीरापर्यंत हॉटेल्स दुकाने रंगरंगोटी लाईंटींग रोषणाईने सजवीली आहेत . रात्री मनोरंजना साठी सोनवणे, महाले, कदम, तीन वाड्यामार्फत भिमा, नामा श्री बंडूभाऊ. धुळे कर , व चि. सोमनाथ नगरदेवळेकर. या तीनवाड्यामार्फत यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . यात्रेस येऊन महाप्रसादाचा लाभ घावा असे आवाहन सावखेडा ग्रामस्थां कडून केले आहे
अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, व गोपनिय शाखेचे डॉ.शरद पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पातोंडा ऑऊटपोष्टचे, बीट हवालदार पो.हे.कॉं. संदेश पाटील , . सुनिल जाधव हे चोख बंदोबस्त ठेऊन आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!