आपला जिल्हा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला आग ; एकाचा होरपळून मृत्यू

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला लागलेल्या भीषण आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मंगळवारी मध्यरात्री पुणे लेन वर उभ्या असलेल्या टेम्पोला आग लागून ही घटना घडली.आग लागण्यापूर्वी बंद पडल्याने उभ्या असलेल्या टेम्पोला बॅरिकेट्स लावून आयआरबीच्या टीमने सुरक्षित केले होते.

मात्र दुर्दैवाने काही वेळाने या टेम्पोला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड खोपोली टीम, देवदूत यंत्रणा, रिलायन्स व आयआरबीच्या फायर ब्रिगेड ने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. परंतु टेम्पोमध्ये सौंदर्यप्रसाधने, अगरबत्ती, वायर व इलेक्ट्रिक साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले.

टेम्पोच्या केबिनमध्ये एक मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळून आला. मृत व्यक्तीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर द्रुतगती मार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये