आरोग्य व शिक्षण

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित, माध्यमिक विद्यालय वरवडे येथे बालदिन साजरा

Spread the love

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित, माध्यमिक विद्यालय वरवडे येथे 14 नोव्हेंबर बालदिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ शिक्षक श्री विचारे सर यांनी भूषविले . प्रथम महान विभूती पंडीत जवाहरलाल नेहरू डॉ . बाबासाहेब आंबेडकर ‘,छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले .सुत्रसंचालन आठवी तील विद्यार्थिनी आर्या बोरकर हिने केले . विद्यार्थ्यांनी भाषणातून पं. नेहरूंचा जीवन प्रवास सांगितला . श्रीम. पवार मॅडम यांनी गोष्टी आणि उदाहरणे देऊन बालदिनाचे महत्च आणि नेहरूजींच्या जीवनातील प्रसंग सांगितले . जेष्ठ शिक्षक श्री जाधवसर यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विचारे सर यांनी शुभेच्छा दिल्या.मा . मुख्याध्यापक श्री देशमुख सर यांनी कार्यक्रमासाठी प्रेरणा दिली . सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री .कुंभार सर यांनी उत्तम नियोजन व कार्यवाही केली .सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिमेस अभिवादन केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!