ताज्या घडामोडी

मुंबई कांदिवली मध्ये खासदार गोपाळ शेट्टी यांची संकल्प सभा संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली
शुक्रवार दिनांक ३० डिसेंबर २०२२रोजी सायंकाळी ६ वाजता सप्ताह क्रीडा मैदान कांदिवली पश्चिम या ठिकाणी सामान्यजनांचा लोकनेता भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांची समस्त कांदिवली मधील झोपड्डपट्टी रहिवांशाच्या उपस्थितित संकल्प सभा पार पडली.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले प्रमाणे कल्याणकारी कामे स्थगीत न करता चालू ठेवावीत,या संकल्पसभेला कांदिवली मधील झोपड्डपट्टी मधील महिला व पुरुष रहिवांशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संसदेत खासदार गोपाळ शेट्टी यांनी पहिल्या माळ्या वरील घराच्या बदली घर मिळण्याच्या प्रस्तावावर सकारात्मकतेने विचार व्हायला हवा,हा मुद्दा मांडल्याने व त्यास सरकार कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच यांचे आदेश निघून अमंलबजावणी होईल.असे मत या संकल्प सभेत व्यक्त करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपले परखड व वास्तववादी मत मांडून मार्गदर्शन करताना सांगितले की, ” पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निष्क्रिय होऊ नये.जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत,जनतेच्या समस्या लोकप्रनिधीना सांगाव्यात,आमच्याशी संवाद साधावा,कार्यकर्त्यांनी एकदम शांत राहणे कधी कधी घातक ही ठरू शकते,झोपड्डपट्टी वाशीयांना घरे मिळत नाहीत,त्यास म्हाडा,सिडकोचे कायदे आडवे येतात.जरी म्हाडा व सिडकोचा जन्म घरे देण्याकरिता झाला असला तरी झोपड्डपट्टी मधील रहिवाशांना ते बिल्डरच वाटतात.शालेय अभ्यासक्रमांत भगवत् गीतेचा समावेश,बाँम्बे हायकोर्टचे मुंबई हायकोर्ट असे नामांतर, मुंबई मधील वाहतूक व्यवस्था केंद्राच्या मदतीने सुधारणे,एस.आर.ए.च्या समस्या,अशा समस्या बाबत मी शासनाशी सातत्याने संर्घष करुन सोडविणारच.पूर्वी मुलीच्या वडिलांना मी लग्नासाठीरुपये २५००० देत असत तीच रक्कम वाढवून आतापासून रुपये ५०००० करीत आहे.” असे संकल्प या संकल्प सभेत खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.विकासक मेहुल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पंडीत,आयोजक गणेश,यांनी यावेळी खासदार गोपाळ शेट्टी यांचे बद्दल आपली मते व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!