आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्युअल रॅलीला उपस्थित राहण्याचे आवाहन

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबई येथे व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण व्हर्च्युअली राज्यातील सर्व तालुक्यातील स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.

मावळ तालुक्यातही वैशाली मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे येथे रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे व्हर्च्युअली नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष बबन भेगडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले

या सोहळ्यासाठी माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, तालुक्याचे आमदार सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे
उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!